Anganwadi Sevika Protest : '...तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही!'; ठाकरेंसमोरच अंगणवाडी सेविका गरजल्या

Anganwadi Sevika Protest In Mumbai : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी अंगणवाडी सेविकांची भाजपविरोधात घोषणाबाजी...
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव-

Maharashtra Politics Latest News : देशात लोकसभा निवडणूक 2024 चे वारे वाहू लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येणार, असा ठाम विश्वास भाजपनेत्यांनी व्यक्त केला आहे. पण त्यांच्या या विश्वासाला कुठेतरी तडा बसण्याची शक्यता आहे. भाजपला आता यापुढे मतदान करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

मुंबईत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन गेल्या महिन्यापासून सुरू आहे. मात्र अद्याप सेविकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. Uddhav Thackeray यांच्या भाषणादरम्यान तिथल्या अंगणवाडी सेविकांनी भाजपला मतदान करणार नसल्याची घोषणा दिली.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Anganwadi Sevika : सरकारं आली अन् गेली, 40 वर्षांपासून अंगणवाडी सेविका तिथेच...

भाजपवर नाराजी का?

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन गेल्या महिना भरापासून सुरू आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी आंदोलन केले होते. पण सरकारकडून आंदोलनाची दखलही कोणी घेतली नाही आणि विचारलेही नाही. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांना भेटल्यानंतर त्यांना या आंदोलनाची कल्पनाही नव्हती. त्यामुळे या सेविकांचा रोष अधिकच वाढला. सरकारलाच आपली काळजी नाही आणि सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना या महिलांमध्ये आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले मंत्री यांना इतर ठिकाणी जाऊन मदत करण्यासाठी वेळ आहे. पण आम्हाला भेटायला वेळ नाही, अशी खंतही अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली. केंद्रातही स्मृती इराणी आमच्याविषयी काहीच बोलत नाहीत. केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही भाजपला मतदान करणार नाही, असा नारा यावेळी आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी दिला.

edited by sachin fulpagare

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com