SSC answer sheet scam Sarkarnama
विदर्भ

SSC answer sheet scam : दहावीच्या उत्तरपत्रिका फुटीला राजकीय छत्र? आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या नियुक्तीमागे काँग्रेस खासदार-ठाकरे आमदारांची शिफारस!

Amravati SSC Answer Sheet Scam: Sudhir Khode Appointment Linked to Balwant Wankhede, Gajanan Lawate? अमरावतील जिल्ह्यातील दहावीच्या उत्तरपत्रिका बाहेरून सोडवण्याच्या गैरव्यवहारातील गटशिक्षणाधिकाऱ्याच्या नियुक्तीच्या शिफारसींमागील राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Amravati education controversy : अमरावती जिल्ह्यातील दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याच्या राजकीय कनेक्शन समोर आली आहे.

पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेला सुधीर खोडे याच्याकडे याच राजकीय कनेक्शनमुळेच अंजनगाव सुर्जी पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रभारी कार्यभार दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुधीर खोडे याची राजकीय कनेक्शन चर्चेत आली असून, उत्तरपत्रिका बाहेर सोडवून आणण्याच्या गैरप्रकारात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उत्तरपत्रिका फुटीच्या या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याचे काँग्रेस (Congress) खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार गजानन लवटे यांच्याशी असलेले कनेक्शन, अमरावती जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नियुक्तीच्या आदेशावरून समोर आलं आहे.

दहावीच्या उत्तरपत्रिका बाहेर नेण्याच्या प्रकारात सुधीर खाडे याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विस्तार शिक्षण अधिकारी (Education) सुनील अभ्यंकर याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल आहे. यात सुधीर खाडे आणि अनिल हाडोळे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी सुधीर खाडे याच्या नियुक्तीमागील राजकीय कनेक्शन समोर आल्याने उत्तरपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर पडण्याच्या प्रकारामागे हेच राजकीय कनेक्शन नव्हते ना, अशी चर्चा रंगली आहे.

उत्तरपत्रिका गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय?

अमरवतीच्या अंजनगाव सुर्जी इथं हे प्रकरण 27 फेब्रुवारीला घडलं. दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर संपला होता. उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या पथकाने अंजनगाव सुर्जी इथल्या सीताबाई संगई विद्यालयाच्या कस्टडीला अचानक भेट देत उत्तरपत्रिकांची तपासणी केली. यात दोन उत्तरपत्रिका कमी असल्याचे पथकाच्या लक्षात आलं. या प्रकरणी पोलिसांनी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्यासह सहा जणांविरोधात 1 मार्चला गुन्हा नोंदवला.

वानखेडे अन् लवटे यांची शिफारस पत्रे

अटकेतील मुख्य आरोपी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला अतिरिक्त पदभार मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय दबाव टाकल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी 3 मार्च 2025, तर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी 25 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिफारस केली होती. या शिफारस पत्रांनंतरच सीईओ महापात्रा यांनी खोडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढला. हा नियुक्तीच्या आदेशाची प्रत आता समोर आली आहे.

राजकीय दबावातून प्रशासनाकडून नियुक्ती?

सुधीर खोडे याची मूळ नियुक्ती पंचायत समिती अमरावती इथं असताना, त्याला 81 किलोमीटर दूर असलेल्या अंजनगाव सुर्जीचा पदभार देण्यात आला. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला विरोध होता, अशी आता माहिती समोर येत आहे. तरी देखील प्रशासनाने राजकीय दबावापोटी ही नियुक्ती केली. या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री कार्यालयाकडेही करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT