Yashomati Thakur demands action against Ashok Kharat Sarkarnama
विदर्भ

Bulldozer Action : सरकारचा दुहेरी मापदंड? खरातच्या घरावर बुलडोजर चालवा; ठाकूरांचा इशाराहल्लाबोल

Bulldozer action demand on Ashok Kharat house: अमरावती लैगिंक शोषणातील आरोपीप्रमाणेच नाशिकमधील अशोक खरात याच्या घरावर बुलडोजर कारवाई सरकारने करावी अशी मागणी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Pradeep Pendhare

Amravati exploitation case : अमरावती परतवाडा इथल्या 180 हिंदू-मुस्लिम युवतींच्या शोषण अन् 350 अश्लील व्हिडिओ व्हायरलप्रकरणी आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याच्या घरावर अचलपूर नगरपालिकेनं 'बुलडोजर' कारवाई करण्यात आली.

तशीच कारवाई नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात सरकार का करत नाही, तर ती सरकारने करावी, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चढवला आहे.

अमरावतीमधील (Amravati) 180 हिंदू-मुस्लिम युवतींच्या लैगिंक शोषणात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोखळे आणि पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत, विशेष पथकामार्फत कारवाईची मागणी केली. संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार ही कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील (Crime) मुख्य संशयित आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर याचं घराची काही बांधकाम अतिक्रमणात असल्याची नोटीस अचलपूर नगरपालिकेने बजावली होती. अतिक्रमण काढून घ्या, असे नोटिसीमध्ये नमूद केले असतानाच, नगरपालिकेने थेट कारवाई करत अतिक्रम हटवले.

अचलपूर नगरपालिकेच्या या कारवाईची सध्या अमरावतीमध्ये चर्चा आहे. ही कारवाई पाहण्यासाठी परतवाडा भागातील स्थानिकांनी मुख्य संशयित आरोपीच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. काहींनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

अयानचं घराचं अतिक्रमणावर कारवाई

मुख्य संशयित आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर हा राहात असलेल्या घराचं, अतिक्रमण म्हणून घराचं काही बांधकाम तोडण्यात आलं. तसंच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पायऱ्यांचा जिना 'जेसीबी'च्या माध्यमातून तोडण्यात आला, तसंच घरासमोरच्या पायऱ्या देखील तोडण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

खरात घरावर 'बुलडोजर' कारवाई करा

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी याच कारवाईप्रमाणे राज्यात गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या लैगिंक शोषणाच्या प्रकरणात अशा प्रकारची सरकारने कारवाई का केली नाही, असा प्रश्न करत, अशी कारवाई तिथं पण झाली पाहिजे, अशी माघणी केली. अशोक खरात याच्या घर सुद्धा 'जेसीबी'ने तोडून टाकण्यात यावं, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

खरातच्या एजेंटावर कारवाई करा

अशोक खरात घर या कारवाईप्रमाणेच तोडलं पाहिजे. त्याची बायको ज्यापद्धतीने गायब झाली आहे, तिला शोधून आणलं पाहिजे. तिला जेलमध्ये डांबली पाहिजे. अशोक खरात अन् त्याची पत्नी कल्पनाचे जे कोणी एजेंट लोकं होते, ते मोकाट झालेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. खरात कोणा-कोणाच्या घरात, याची चौकशी व्हावी, अशीही मागणी, यशोमती ठाकूर यांनी लावून धरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT