Navneet Rana Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati Lok Sabha Election 2024 Exit Poll: बच्चू कडू फॅक्टर फेल; अमरावतीत पुन्हा नवनीत राणाच? काय सांगतोय एक्झिट पोल...

Lok Sabha Election 2024 Exit Poll Navneet Rana Bacchu Kadu: अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर असून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांना धक्का बसण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवली आहे.

Jagdish Patil

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान शनिवारी (1 जून) रोजी पार पडलं. मतदानानंतर सर्वांच्या नजरा 'एक्झिट पोल'कडे लागल्या होत्या. आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत असून टीव्ही-9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर असून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांना धक्का बसण्याची शक्यता पोलमध्ये पुढे येत आहे.

अमरावती मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पासून चर्चेत होता. अमरावतीतून भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीने बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिली होती. मात्र राणा यांच्या उमेदवारीला प्रहारच्या बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला होता.

यसाठी बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बुब यांना राणांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात नवनीत राणांना धक्का बसणार की काय? अशा चर्चा सुरु होत्या. अशातच आता समोर आलेली एक्झिट पोलची आकडेवारी राणा यांना दिलासा देणारी तर बच्चू कडू आणि बळवंत वानखेडे यांना मोठा धक्का देणारी असल्याचं दिसत आहे. शिवाय एक्झिट पोलचा हा अंदाच केवळ अंदाज राहणार की तो सत्यात उतरणार हे चार जूनलाच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT