Mumbai, 01 June : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आला आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर या आघाडीवर, तर भाजपचे उमेदवार तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर राहण्याचा अंदाज आहे.
टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार हे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर बाळू धानोरकर हे निवडून आले होते. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले ते एकमेव खासदार होते. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्या जागेवरून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने तिकिट दिले होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर मुनगंटीवार यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.