Abhijit Dhepe was also unexpectedly elected : प्रतिष्ठेच्या अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू निवडून आले आहेत. तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार अभिजित ढेपे हेसुद्धा अनपेक्षितपणे निवडून आले. कॉंग्रेससाठी सर्व परिस्थिती अनुकूल असताना हा निकाल आलाच कसा, या विचाराने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. (Many people are confused)
राज्याच्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांचेच अध्यक्ष व उपाध्यक्ष जिल्हा बॅंकेवर निवडून येतील, अशीच परिस्थितीत होती. अध्यक्षपदासाठी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते आणि उपाध्यक्षपदासाठी ठाकूर यांचे समर्थक हरिभाऊ मोहोड यांचीच वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा होती. पण आज झाले भलतेच. हा निकाल म्हणजे आमदार ठाकूर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
काय घडले ?
आमदार बच्चू कडू यांनी आज (ता. २४) सकाळी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. तेव्हाच रात्रीतून काहीतरी शिजल्याचा संशय यायला लागला. उपाध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अभिजित ढेपे यांनी अर्ज भरला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस होणार, हे तेव्हाच सर्वांच्या लक्षात आले होते. पण नेमके काय, हे मात्र कळायला मार्ग नव्हता.
मुंबईवरून हलली सूत्रे ?
या निवडणुकीत कॉंग्रेसची तीन मते फुटल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्याकडे संचालकांची आवश्यक संख्या नव्हती. तरीही त्यांनी सकाळी अर्ज दाखल केल्यामुळे ठाकूर गटात शंकेची पाल चुकचुकली होती. तेव्हापासून या निवडणूक चुरस वाढली होती. रविवारी (ता. २३) रात्रीतून चक्र फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता कॉंग्रेसची फुटलेली ती तीन मते कुणाची, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बबलू देशमुख तसेच अॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे निश्चित करण्यास फारसे कठीण जाणार नाही, असे अन्य संचालकांचे मत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दीड वर्षासाठी सुधाकर भारसाकळे यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष सुधाकर भारसाकळे व उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.
जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व असले तरी पहिल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Election) आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्या पॅनलकडून उमेदवार देण्यात आले होते. त्यांचा पराभव झाला. यावेळीसुद्धा ही निवडणूक अविरोध होऊ द्यायची नसल्याने विरोधी पॅनलकडून ही रणनीती खेळण्यात आली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.