Bacchu Kadu News : ‘माझा सूर बदलण्याची कुणाची ताकद नाही, बोलावलं होतं म्हणून दिल्लीला गेलो होतो’

Kirit Somayya : त्यांच्या वैयक्तिक जीवनातील तो विषय असेल तर त्याला या पातळीवर नेऊ नये.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

No one has been supported in the election so far : कुणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली नाही पाहिजे. त्या ‘व्हिडिओ’मध्ये नेमकं काय आहे, हे मी बघितलं नाही. त्यासंदर्भात कुणाची काही तक्रार आहे का, कुणावर अत्याचार झाला आहे का, या सर्व बाबी तपासल्या पाहिजे, असे माजी राज्यमंत्री आमदार बच्चू भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित ‘व्हिडिओ’बाबत म्हणाले. (Does anyone have any complaints, has anyone been oppressed)

दिल्ली येथील ‘एनडीए’ची बैठक आटोपून नागपुरात आले असता विमानतळावर आमदार कडू पत्रकारांशी बोलत होते. तो ‘व्हिडिओ’ कशासाठी काढण्यात आला, ते मला माहिती नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील तो विषय असेल तर त्याला या पातळीवर नेऊ नये. आता जनता हा विषय कशा पद्धतीने घेते, हा जनतेचा निर्णय आहे. त्यावर अधिक काही बोलले जाऊ शकत नाही.

तो ‘व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने आणखी कुणाची बदनामी झाली का, त्यामध्ये कुणावर अत्याचार झाला आहे का, या बाबी तपासल्या गेल्या पाहिजे, असे ते म्हणाले. काल दिल्लीत ‘एनडीए’च्या बैठकीत तुम्ही सहभागी झाले होते, ‘एनडीए’सोबत जाणार का, असे विचारले असता, हा निर्णय मी एकटा घेत नाही. कार्यकर्ते आमच्यासाठी जीव की प्राण आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतरच हा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

मी सरकारला पाठिंबा दिला. पण निवडणुकीमध्ये आजवर कुणाला पाठिंबा दिला नाही की, कुणाचा पाठिंबा घेतला नाही. कॉंग्रेस किंवा भाजपलाही निवडणुकीत आम्ही पाठिंबा कधी दिला नाही. `एनडीए’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण ‘इंडिया’कडून असे कुठलेही निमंत्रण नाही, असे आमदार कडू म्हणाले.

Bacchu Kadu
Bacchu Kadu News : मुख्यमंत्र्यांची अडचण पाहून मंत्रिपदावरील दावा सोडला; पण या आमदाराला मंत्री करा, बच्चू कडूंची नवी मागणी

दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हे मोठे काम केले आहे. एकनाथ शिंदेंकडे मंत्रिपद मागणाऱ्यांची मोठी रांग आहे. माझ्या विनंतीवरून त्यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे ते अडचणीत येतील, असे कुठलेही काम आपल्या हातून होऊ नये, अशी माझी भूमिका आहे, असे ते म्हणाले. यावर दिल्लीवरून (Delhi) आल्यावर तुमचा सूर बदललाय का, असे विचारले असता, ‘माझा सूर बदलण्याची कुणाची ताकद नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.

अधिवेशन सुरू झाल्यापासून तुम्ही सभागृहात गेले नाही, असे विचारले असता, अधिवेशनात उद्यापासून सहभागी होणार आहे, शेतकरी, दिव्यांग, कंत्राटी कामगार, दुर्लक्षित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी उद्यापासून सभागृहात बच्चू कडूचा (Bacchu Kadu) आवाज घुमणार आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com