Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News : बच्चू कडूंनी आरोग्य अधिकाऱ्याला भरला दम ; आशा सेविकांना ऑनलाइन कामाची सक्ती केली तर झोडपून काढणार...

Amravati news : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला झापले.

सरकारनामा ब्यूरो

Amravati : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक, बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा असते. अशातच त्यांनी आता आशा सेविकांना ऑनलाइन कामाची सक्ती करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना झाडपून काढण्याचा इशारा दिला आहे.

आशा सेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाइन काम करण्यासाठी सक्ती केली जात असल्याची तक्रार अनेक दिवसापासून आहे. ऑनलाइन काम केले नाही तर कामावरुन कमी करण्याची धमकी अधिकारी वारंवार आशा सेविकांना देत असल्याची माहिती आहे.

यातील काही आशा सेविकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. कडूंना त्यांनी राख्या बांधल्या. संबधित प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेव्हा बच्चू कडूंनी लगेचच फोन करून आरोग्य विभागाच्या त्या अधिकाऱ्याला झापले. आशा सेविकांना कामाची सक्ती करू नका, असा सज्जड दम बच्चू कडूंनी त्यांना भरला.

आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत सध्या बच्चू कडू आहेत. यासंदर्भात ३० ऑगस्टपर्यंतची मुदत सचिन तेंडुलकरला दिली होती, असंही बच्चू कडूंचं म्हणणं आहे. ऑनलाईन गेमिंगवरून त्यांनी तेंडुलकरांना लक्ष्य केले आहे.

“फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू”, असं बच्चू कडूंनी नमूद केलं. “३० तारखेला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करू”, असं सांगतानाच सचिन तेंडुलकरविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT