Bhavana Gawali News : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भावना गवळींनी दिले प्रत्युत्तर; म्हणाल्या, "ठाकरेंना कोणतेही नाते...

Bhavana Gawali Reacts on Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंना कोणतेही नाते टिकवता आले नाही," असे भावना गवळी म्हणाल्या.
Bhavana Gawali Latest News updates
Bhavana Gawali Latest News updates sarkarnama

Yavatmal : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल (रविवारी) हिंगोलीत बोलताना शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी यांच्यावर सडकून टीका केली. गवळींनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. (Bhavana Gawali news)

भावना गवळी यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. यावरून ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती, गवळी यांच्यावर यापूर्वीही ठाकरेंनी गवळींना लक्ष्य केले आहे.

Bhavana Gawali Latest News updates
Nitesh Rane News: देसाईंचा एन. डी . स्टुडिओ ठाकरेंना हवा होता ; राणेंचा गंभीर आरोप

"उध्दव ठाकरेंनी पवित्र नात्यावर वारंवार वादग्रस्त विधाने केली आहेत. उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्यातीव वाद कधीच मिटले असते, मात्र, उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नाही, निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत लढली पण निकालानंतर त्यांनी युती केली नाही. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदार, आमदारांसाठी काम केले मागच्या वेळी पाहिले की मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी दोन कोटी दिले तेच काम करताना शिंदे साहेब यांनी शंभर कोटी खर्च केले आहेत. उध्दव ठाकरेंना कोणतेही नाते टिकवता आले नाही," असे भावना गवळी म्हणाल्या.

Bhavana Gawali Latest News updates
Vijay Wadettiwar News : दलित,ओबीसी, आदिवासींना वापरा अन् फेका ही भाजपची भूमिका ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

"तुमच्यासोबतचे आमदार, खासदार का गेले यांचे चिंतन तुम्ही केले नाही, माझ्या सारख्या कर्तृत्ववान महिला गेले 25 वर्ष पासून काम करत आहे मी माझ्या मतदार संघात 24 वर्ष पासून रक्षाबंधन उपक्रम राबविते. मी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदींना राखी बांधली. या बंधनावर आपण बोलू नये, आपण बंधन पाळले नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे," असा प्रश्न गवळींनी ठाकरेंना केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com