Navneet Rana, Imtiaz Jaleel Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana: इम्तियाज जलील हे ओवेसींचे चमचे, हिंमत असेल तर अमरावतीमधून लढा; राणा कडाडल्या...

Navneet Rana open Challenge To Imtiaz Jaleel: असली नौटंकी आमच्यासोबत चालणार नाही...

Mangesh Mahale

Amravati: खासदार नवनीत राणांना हनुमान चालिसा म्हणायची असेल, तर त्यांनी घरातच म्हणावी, असे विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. नवनीत राणा यांचा अमरावतीत येऊन पराभव करणार, असे आव्हानदेखील त्यांनी केले. त्यांच्या विधानाचा राणांनी अमरावतीत खरपूस समाचार घेतला.

या देशातील लोकांनी अनेक पिढ्यापर्यंत राम मंदिराची वाट बघितली, तुमच्यासारखे अनेक जण येऊन गेलेत, तुमच्यात दम असेल तर अमरावतीमध्ये येऊन माझ्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असे आव्हान त्यांनी इम्तियाज जलील यांना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगरची जनता त्यांना जागा दाखवेल. नवनीत राणा ही महिला आहे, जेव्हा ती पदर खोचून बाहेर पडते तेव्हा तुमच्यासारखे 56 आले नि गेले, तुमच्या सारख्यांना घाबरत नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

"या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल,' असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यावर 'तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हा देश आला आहे का?, असे विधान इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या टीकेला राणांनी उत्तर दिले होते. 'इम्तियाज जलील हे ओवेसींचे चमचे आहेत. त्यांच्यासारखे किती आले अन् किती गेले,' असा घणाघात राणा यांनी केला.

राणांवर टीका करताना इम्तियाज काय म्हणाले...

"तुम्हाला वाटत असेल की, दिल्लीत तुमचा बाप बसला आहे. त्या बापाच्या जिवावर तुम्ही काहीही बोलणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. चांगले राहाल तर आमच्याकडूनदेखील चांगली अपेक्षा ठेवा, पण तुम्हाला वाटत असेल की, मी काहीही बोलणार, पण लक्षात ठेवा महिला असल्याने सन्मान करतोय. स्वतःचं घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत. असली नौटंकी आमच्यासोबत चालणार नाही."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT