Hingoli News: काँग्रेसचा दावा, पण हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचाच डाव...

Hingoli Lok Sabha Constituency 2024: हेमंत पाटलांना ठाकरे धडा शिकवणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Hingoli: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 23 व 24 तारखेला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने राज्यातील 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जिथे समन्वयक नेमले त्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटच लढणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा दोनदिवसीय हिंगोली दौरा म्हणजे ही जागा ठाकरे गटच लढणार हे स्पष्ट करतो. अशोक चव्हाण महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेसमध्ये असताना हिंगोलीच्या जागेसाठी त्यांनी आग्रह धरला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन आणि ताकद आहे, असा दावा करत चव्हाण यांनी या बदल्यात जालना लोकसभेचा मतदारसंघ ठाकरे यांनी घ्यावा, असा प्रस्ताव जागावाटपाच्या संदर्भातील चर्चेवेळी दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अशोक चव्हाण काँग्रेससोडून भाजपमध्ये गेले तसा काँग्रेसचा हिंगोली लोकसभा मतदारसंघावरील दावाही निखळून पडला की काय? अशी चर्चा उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्ताने होत आहे. काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांनी अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये गेले असले तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढवणार, असा दावा काही दिवसांपूर्वीच केला होता.

परंतु उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे हिंगोलीची जागा तेच लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी हिंगोली मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Uddhav Thackeray
Rohit Pawar News: 'बैलाकडे पाहून कळतं प्रामाणिक कसं राहावं, लोक आपल्या काकांनाही विसरतात; रोहितदादांचा रोख कुणाकडे

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा दुसरा हिंगोली दौरा असणार आहे. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्या गद्दारीचा हिशेब चुकता करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यात यश मिळवल्याचे बोलले जाते.

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असेपर्यंत हिंगोलीच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. परंतु अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर मात्र ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा कितीही दावा असला तरी आपणच डाव टाकणार हे दाखवून दिले आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील आपल्या हिंगोली दौऱ्यात एकदा नव्हे तर दोन वेळा हिंगोली मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढवणार याबद्दल शंका नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीत एकनाथ शिंदेंचे खासदार हेमंत पाटील विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये तगडी फाइट पाहायला मिळणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com