Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati News : कॉंग्रेसची २५ वर्षांची सत्ता उलथवून बच्चू कडूंनी जिल्ह्याची तिजोरी घेतली ताब्यात !

सरकारनामा ब्यूरो

Congress of the district got a big shock : बहुचर्चित अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना ‘दे धक्का’ करत माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अध्यक्षपद पटकावले. गेल्या २५ वर्षांपासून कॉंग्रेसचा एकछत्री अंमल संपुष्टात आणून बच्चू कडूंनी जिल्ह्याची तिजोरी ताब्यात घेतली. (Bachu Kadu took over the treasury of the district)

आजच्या (ता. २४) निकालाने यशोमती ठाकूर आणि जिल्ह्याच्या कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. बहुमत नसतानासुद्धा काँग्रेस समर्थीत पॅनलचे तीन सदस्य फोडून आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. अतिशय चुरशीच्या आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेले माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. जवळपास २५ वर्षांपासून जिल्हा बँकेवर असलेली काँग्रेसची एकहाती सत्ता यानिमित्ताने संपुष्टात आली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर बबलू देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे समर्थीत सहकार पॅनलचे १३ संचालक असतानाही आमदार बच्चू कडू यांनी अध्यक्षपदावर विजय मिळविला.

अन् बसला धक्का..

बच्चू कडू यांच्या पॅनलकडे सहा संचालक आहेत, तर दोन अपक्षांच्या मदतीने त्यांनी जिल्हा बँकेचा किल्ला सर केला. उपाध्यक्षपदावर अपक्ष अभिजित ढेपे यांची वर्णी लागली. त्यांनी यशोमती ठाकूर गटाचे हरिभाऊ मोहोड यांचा पराभव केला. सुरुवातीपासूनच ही निवडणूक चुरशीची ठरली. मतदानापर्यंत काँग्रेसला आपले सदस्य फुटणार, याची किंचितही कल्पना नव्हती, मात्र निकालानंतर सर्वांनाच धक्का बसला.

जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणार कलाटणी..

२५ वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसच्या (Congress) नेत्यांचे एकछत्री वर्चस्व होते, मात्र बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ते मोडीत काढले. बच्चू कडू यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्या (Amravati) राजकारणातसुद्धा मोठे फेरबदल होण्याची ही नांदी मानली जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT