Amravati news : राज्यात नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे महिलांच्या लैगिंक शोषणाचे प्रकरण राज्यात गाजत आहे. तसंच नाशिकमधील आयटीमधील कंपनीतील लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आलं आहे.
नाशिकमधील रवींद्र एरंडे प्रकरणही गाजत आहे. नवी मुंबईतील भोंदूबाबाचं लैगिंक शोषणाची प्रकरण राज्यात गाजत असतानाच, अमरावतीमधील परतवाडा इथल्या लैगिंक शोषणाच्या प्रकरणानं राज्य पुन्हा हादरलं आहे. दोन मुस्लिम युवक 180 युवतींचं लैगिंक शोषण करत असून, 350 व्हिडिओ अन् फोट व्हायरल करत आहे. याप्रकरणी भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट पोलिस अधीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे.
दोन मुस्लिम युवकांनी 180 हिंदू (Hindu)-मुस्लिम युवती, अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून यावरून अमरावतीत राडा सुरू आहे. यात परतवाडा परिसरातील तब्बल 350च्या वर मुलींचे अश्लील व्हिडिओ अन् फोटो व्हायरल झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून हे व्हिडिओ अन् फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अमरावती (Amravati) ग्रामीण पोलिसाकंडून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने भाजप अन् हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी याप्रकरणी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खासदार बोंडे यांनी गंभीर आरोप केले.
खासदार अनिल बोंडे म्हणाले, "अमरावतीच्या परवाडा इथं धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन मुस्लिम मुलांनी साधारण 350 अश्लील व्हिडिओ अन् फोटो व्हायरल केले आहेत. हिंदू मुलींचे, अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ अन् फोटो आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मुलींना जीवे मारण्याच्या धमक्या देतात, वेठीस धरतात, पैसे उकळतात, वेश्या व्यावसायाकडे देखील ढकलतात. तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी यावर कारवाई केली नाही. संपर्क केल्यावर तक्रार दाखल नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केली आहे."
अशोक खरात प्रकरणात कोणतीही तक्रार नसताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गुन्हा दाखल करायला लावले, एसआयटी नेमली. त्याला अटक केल्यानंतर बळी पडलेल्या महिला समोर आल्या, अन् तक्रारी सुरू झाल्या. परंतु आता इथं हे मोकळे सुटलेले आहे. पोलिसांनी अजून कारवाई केलेली नाही. तक्रार करत ही संघटीत गुन्हेगारी असल्याकडे अमरावती पोलिसांचे लक्ष वेधल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितलं.
मुलींना ब्लॅकमेल करून, त्यांना हाॅटेलवर बोलावून घेऊन, त्यांचे व्हिडिओ काढले जात आहे. परतवाड्यामध्ये हे अतिशय गंभीर प्रकरण सुरू आहे. लव जिहाद होताच, पण आता अशा प्रकारामध्ये हिंदू अन् मुस्लिम मुली देखील सापडल्या आहेत. तक्रार नाही म्हणून हे गुन्हेगार अतिशय ताकदीने सुटतील, असा गंभीर मुद्याकडे अनिल बोंडे यांनी पोलिसांचं लक्ष वेधलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.