Lawrence Bishnoi gang Sarkarnama
विदर्भ

Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित टोळीशी 'चकमक'? कुख्यात टोळीच्या गोळीबाराला पोलिसांचं चोख प्रत्युत्तर...

Amravati Paratwada Police Arrest 13 After Gunfire with Lawrence Bishnoi Gang Linked Interstate Gang : अमरावती शहरातील परतवाडा इथं काल गुरूवारी रात्री आंतरराज्य चोरांची टोळी अन् पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Amravati Paratwada firing case : लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असलेल्या संशयित आतंरराज्य कुख्यात चोरांच्या टोळीनं अमरावतीमधील परतवाडा इथं गुरूवारी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी देखील या टोळीला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

टोळीबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी संयमाने केलेल्या कारवाईत टोळीतील 13 जणांना अटक करण्यात आलं. दरम्यान, चोर-पोलिसांचा हा थरार गुरूवारी रात्री साडेदहा वाजता रंगला होता. परतवाडा बसस्थानक आणि त्यासमोरील परिसरातला या कारवाईमुळे छावणीचं स्वरूप आलं होते.

नागपूर (Nagpur) गुन्हे शाखेचं पथक अमरावती ग्रामीण पोलिस कार्यालयात गुरूवारी सांयकाळी दाखल झालं. यानंतर अमरावती ग्रामीणच्या गुन्हे शाखेसोबत, दोन्ही पथकं परतवाडा इथं पोहोचली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, परतवाडा इथं लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असलेली संशयित आंतरराज्य चोरांची टोळी मोठी घटना घडवण्याच्या तयारीत आहे.

पोलिसांच्या (Police) या दोन्ही पथकानं सापळा रचून ब्राह्मणसभा परिसरातून टोळीतील तिघांना ताब्यात घेतलं. ही टोळी परिसरात विखुरलेली होती. पोलिसांनी पहिल्या तिघांना पकडल्यानंतर टोळीतील उर्वरीत चोरांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी घेरल्याचा संशय आल्याने टोळीतील चोर देखील सावध झाली. दबा धरून बसत कारवाई करत असलेल्या पोलिसांना उत्तर देण्याची तयारी सुरू केली.

परतवाडा बसस्थानक परिसरात चोर-पोलिसांचा हा थरार रंगला होता, त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. पोलिस अन् चोरांमध्ये चकमक सुरू झाली. चोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांसमोर टोळी जास्तवेळ दम धरू शकली नाही. पोलिसांनी शिताफीनं चोरांना ताब्यात घेतलं.

या कारवाईबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. पोलिस अधिकृतरीत्या अजूनही कोणतंही निवेदन करण्यात आलेलं नाही. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळावरून टोळीसह 13 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परतवाडा पोलिस ठाण्यात या टोळीला आणल्यानंतर पुढं कारवाईसाठी अमरवती पोलिस मुख्यालयात नेण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिस देखील या टोळीला ताब्यात घेऊ शकते. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परतवाडा हादरला आहे. कारवाईत अमरावती स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी वानखेडे यांनी पथकाचं नेतृत्व केलं. स्थानिक ठाण्यात फक्त या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT