ST Bus Driver Suicide : चालकाने एसटी बसमध्येच घेतला गळफास; एसटी महामंडळात खळबळ...

Ahilyanagar Tarakpur ST Bus Driver Suresh Dhamore Suicide: एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील चालकाने चालकाने एसटी बसमध्ये गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.
ST Bus Driver Suicide: Shocking Incident in ST Corporation
ST Bus Driver Suicide: Shocking Incident in ST CorporationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra ST Corporation News : अहिल्यानगरच्या सारोळा कसार इथले सुरेश चंद्रभान धामोरे (वय 54) यांनी गळफास घेतला. एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात या घटनेनं खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. गळफास घेण्यामागे धक्कादायक, असे कारण पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांना तारकपूर आगारात उभ्या असलेल्या बसमध्ये (एमएच 40-क्यू 6018) एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी मिळाली. तोफखाना पोलिसांना चौकशीत सुरेश धामोरे, असे नाव आढळले. तसेच ही व्यक्ती एसटी महामंडळात (MSRTC) असून, ती चालक म्हणून काम करत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली.

तोफखाना पोलिसांनी (Police) सुरेश धामोरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत सुरेश धामोरे यांचा मृत्यू झाल्याचे निदान झाले. सुरेश धामोरे यांनी बसमध्येच गळफास घेतल्याची माहिती कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तारकपूर आगारात कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.

ST Bus Driver Suicide: Shocking Incident in ST Corporation
Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ भरपावसात धडाडली; 'ही' आहेत भाषणातील 10 मोठी विधानं

तोफखाना पोलिसांनी या घटनेची पार्श्वभूमी सांगताना, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. चालक सुरेश धामोरे यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल झाला होता. वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांनी फिर्याद दिली होती. चालक सुरेश धामोरे हे तारकपूर-भोजपुरी बसवर कर्तव्यावर होते. तपासणीत त्यांनी मद्यप्रशासन केल्याचा संशय होता.

ST Bus Driver Suicide: Shocking Incident in ST Corporation
Rajnath Singh : सर क्रीकचा वाद तापला : राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला कराचीचा अल्टिमेटम

वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांनी मद्यसेवन केल्याचे आढळून आले. त्यामुळे दारूबंदी अधिनियमानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. यातूनच कारवाईच्या धक्क्याने किंवा बदनामीच्या भीतीने सुरेश धामोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याशिवाय अन् काही कारण आहे का? याची शोध तोफखाना पोलिस घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com