Amravati News, 16 Nov : अमरावतीमध्ये ऐन स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे मेळघाट विधानसभा प्रमुख तथा धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सुनील चौथमल यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे चौथमल यांच्या प्रवेशामुळे भाजपची मेळघाटमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.
चौथमल यांनी अमरावतीत भाजप निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर भाजप सुनील चौथमल यांना धारनी नगरपंचायतमधून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता भाजपने ऐन स्थानिकच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा मोठा नेता गळाला लावल्याचं पाहायला मिळत आहे. कारण धारनी नगरपंचायत क्षेत्रात चौथमल यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाला आगामी निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी चिखलदरा नगरपरिषदमधून अजित पवाराच्या राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अमरावतीत भाजपने आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढवल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.