Sangli Politics : जावयासाठी सासरा पक्षाच्या विरोधात, सांगलीत कदमांचा धाडसी निर्णय

Sangli Shirala Politics : 'मी आमचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली असून नगरपंचायत निवडणुकीपुरताच माझा हा निर्णय असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. आत्ता होणाऱ्या शिराळा नगरपंचायत निवडणुकी पुरता माझा हा निर्णय झालेला आहे.'
Vishwas Kadam, Prithvi Singh Naik
Vishwas Kadam meets local voters in Shirala as he actively campaigns for his son-in-law, stepping beyond party boundaries. This rare political gesture highlights a bold family-first decision in the Shirala election.Sarkarnama
Published on
Updated on

शिवाजी चौगुले

Sangli News, 16 Nov : नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या जावयाच्या उमेदवारीला मजबूत पाठबळ देण्यासाठी सासऱ्यांनी स्वतःचा पक्ष तात्पुरता बाजूला ठेवत थेट प्रचाराच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

कौटुंबिक नातेसंबंध आणि स्थानिक राजकारणाचा समतोल साधत सासरे विश्वास कदम स्वतः जावयासाठी घराघरात भेटीगाठी देत मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘कुटुंब विरुद्ध पक्ष’ असा वेगळाच राजकीय रंग शिराळा नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

याची कबुली सासऱ्यांनी आपल्या नेत्यांची परवानगी काढून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे स्थानिक राजकारणात नवीच चर्चा रंगू लागली आहे. शिराळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते व विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पृथ्वीसिंग नाईक हे माझे जावई आहेत.

ते शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शिराळा नगरपंचायतची निवडणूक लढवत आहेत. याबाबत मी आमचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली असून नगरपंचायत निवडणुकीपुरताच माझा हा निर्णय असल्याचे मी त्यांना सांगितले आहे.

Vishwas Kadam, Prithvi Singh Naik
Kolhapur Politics : मुश्रीफांना एकाकी पाडून जनसुराज्य, भाजप अन जनता दलाची युती; गडहिंग्लजमध्ये विधानसभेची परतफेड होणार!

आत्ता होणाऱ्या शिराळा नगरपंचायत निवडणुकी पुरता माझा हा निर्णय झालेला आहे. जावई म्हणून पृथ्वीसिंग नाईक यांना पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य असल्याने मी व माझ्या कुटुंबातील सर्वजण पृथ्वीसिंग नाईक यांच्या प्रचारात सक्रिय असणार आहे. त्यात पुढे म्हटले आहे, २०१३ पासून आज पर्यंत मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडली आहे.

नगरपंचायत निवडणुकीनंतर देखील मी मानसिंगराव नाईक यांच्या विचारानेच काम करणार आहे. घरगुती नातेसंबंध असल्याने या निवडणुकीपुरता माझा हा निर्णय असेल. कदम यांच्या या निर्णयाने शिराळा नगरपंचायत निवडणुकीत वेगळा राजकीय रंग भरला असून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला या त्यांच्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

Vishwas Kadam, Prithvi Singh Naik
Rahul Gandhi : राहुल गांधींची बिहारमध्ये 1300 किलोमीटर पायपीट; 110 मतदारसंघात प्रचार, झालं काय?

त्यामुळे आता जावयासाठी सासऱ्याने पदाचा व तात्पुरता राजकीय विचाराचा त्याग केल्याचं दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी शिराळा नगरपंचायतचे पहिले आरक्षण सर्वसाधारण पडले होते. तेव्हा विश्वास कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)पक्षातून नगराध्यक्षपदासाठी प्रमुख इच्छुक होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांची मुलगी पृथ्वीसिंग नाईक यांना दिली.

पृथ्वीसिंग नाईक हे ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पुन्हा आता दोन महिन्यांनी फेर आरक्षण ही सर्वसाधारण पडले. त्यामुळे जावयासाठी सासऱ्यांनी माघार घेतली. आता तर तात्पुरता पक्षीय विचार बाजूला ठेवून जावयाच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता नात्यांसाठी पक्षाची विचारधारा काहीकाळ दूर केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com