Bachchu Kadu Allegation Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu Allegation : मला जेलमध्ये टाकण्याचा 'प्लॅन', राज्याच्या 'मुख्य' माणसाच्या दालनात झाली चर्चा; बच्चू कडू यांनी फोडला 'बाॅम्ब'

Bachchu Kadu Alleges BJP Planning to Send Him to Jail Amravati Politics News : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी उपचारादरम्यान तुरुंगात टाकण्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

Pradeep Pendhare

Bachchu Kadu vs BJP : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. बच्चू कडू यांच्या या आरोपाच्या निशाण्यावर सत्ताधारी भाजप असल्याचे स्पष्ट समजत असलं, तरी त्यांनी नाव घेणं टाळलं आहे.

मात्र 'समझने वालों को इशारा काफी होता है', या संकेतातून सर्व काही सूचक सांगून टाकत, हा आरोप करत, सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना (Farmers) कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या थकीत अनुदानासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले. सत्ताधारी महायुतीमधील शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घेतलं. मात्र या आंदोलनाकडे सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपने लांबूनच प्रतिसाद दिला. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालवलेल्या बच्चू कडू यांनी उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना खळबळ उडवून देणारा आरोप करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, या" आंदोलनाच्या अगोदरपासूनच माझ्यावर दबाव होता. तसा तो आणला जात होता. अमरावती सहकारी बँकेतील माझे सहकारी संचालक देखील मला सांगत होते. तुम्ही जास्त बोलू नका. अडचणी निर्माण होतील". आता तर आंदोलनामध्ये एक आणखी माहिती समोर आली. ती थेट राज्याच्या मुख्य माणसांच्या दालनातील असल्याचे बच्चू कडू यांनी खळबळ उडवून दिली.

"राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले, अन् तिथं चर्चा झाली. त्यावेळी तिथं एक अधिकारी देखील उपस्थित होता. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, बच्चू कडू जेलमध्ये सप्टेंबरपर्यंत जेलमध्ये जातील, अशी व्यवस्था करा. तुमच्या स्तरावर देखील अन् प्रशासकीय स्तरावर कसे अडचणी येतील, ते शोधून काढा. बंदोबस्त करा, अशी ही चर्चा होती", असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

भाजपला डिवचलं

'या दबावाची सुरुवात झाली होती. ते राजकीय दृष्ट्या करतातच. त्यात काही नवल नाही. हे त्यांच्याकडून अपेक्षित देखील आहे. हे अगोदरच सांगितले म्हटले होते', असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला डिवचलं.

भगतसिंगासारखं लढणार

पण, आईने सांगितलं अन् शिकवण दिली आहे की, सार्वजनिक जीवनात काम करत असताना, सर्वसामान्यांच्या हितासाठी भगतसिंग सारखा लढ. त्यानुसार आम्ही लढलो. हे सर्व झाल्यावर देखील आम्ही लढलो आणि टिकलो. ही आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस आहे. या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू, असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

सत्ताधारी भाजपवर रोख...

दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याचा इशारा सत्ताधारी भाजपकडे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांनी थेट उल्लेख टाळला असला, तरी त्यांचा रोख हा भाजपकडे आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीसह सर्व विरोधकांनी पाठिंबा दिला होता. भाजप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष तर रस्त्यावर उतरला होता. असे असले तरी, महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांच्या आंदोलनात मध्यस्थीची भूमिका निभावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT