
Sonia Gandhi Delhi hospital : काँग्रेस ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाच्या आजारामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना उपचारासाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी वैद्यकीय पथक नेमण्यात आल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे.
सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना गेल्या काही आठवड्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. हा आजार पुन्हा उफळला. फेब्रुवारी महिन्यात देखील पोटाशी संबंधित समस्यांसाठी त्यांना त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ञांच्या देखरेखीखाली एक दिवस राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये सोनिया गांधी यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला प्रवास केला होता. या प्रवासात त्यांच्याबरोबर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी हेही होते.
सोनिया गांधी यांना मध्यतंरी शिमला इथल्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शिमलाहून परतल्यानंतर काही तपासण्यांसाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातही भेट दिली होती. तथापि, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनली आहे.
दरम्यान, सर गंगाराम रुग्णालयाने रविवारी सोनिया गांधी यांना उपचारासाठी दाखल करून घेत, पोटाशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली. 'काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची देखरेख केली जात आहे', असे रुग्णालयाने म्हटले आहे.
काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी पसरताच, पक्षाच्या सदस्यांनी आणि समर्थकांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांना लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेस पक्षाकडून अधिकृती अशी कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.