Ravi Rana Vs Yashomati Thakur Sarkarnama
विदर्भ

Ravi Rana Vs Yashomati Thakur : राणांनी खोडी काढली, यशोमती ठाकूर यांचा संताप; म्हणाल्या, 'भैया-भाभी अवकातीत...' (Video)

Ravi Rana Angry Over Diwali Grocery Sent to Yashomati Thakur : महायुतीमधील आमदार रवी राणा यांनी दिवाळी किराणा पाठवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Diwali controversy Amravati : राणा दाम्पत्य अन् काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय द्वंद संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहे. दिवाळी सणाला देखील राणा-ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळला. यावेळी आमदार रवी राणा यांनी खोडी काढली.

यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी आमदार रवी राणा यांनी दिवाळी किराणा पाठवत ही खोडी काढली. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. 'भैया-भाभीनं अवकातीत राहायचं', असा खणखणीत इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवल्याने त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. "भैया अन् भाभी अवकातीत राहायचं. मी पहिल्यांदा पराभूत झाली नाही. मी पराभूत झाली, किंवा जिंकली, मला काही फरक पडत नाही. मी पक्ष बदलत नाही. सरड्यासारखे रंग बदलत नाही," असा घणाघात ठाकूर यांनी राणा दाम्पत्याविरोधात केला.

'तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढे तुम्हाला सांगते. पुन्हा कधी अशी भानगड केली. तुम्हाला असे उत्तर देईल की, तुम्ही याद राखाल,' असा इशारा काँग्रेस (Congress) यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यांना दिला. मागच्या 10 वर्षांत काही विचित्र लोक राजकारणामध्ये आले आहेत अन् त्यांनी अमरावतीचे नाव खराब केलं आहे, असाही टोला ठाकूर यांनी लगावला.

'एकदम हलकटपणाची वागणूक ते देतात, मलाही या दिवाळीत त्याचा अनुभव आला. हे चित्र-विचित्र लोक आहे. नवरा कुठे? बायको कुठे? कधी सत्तेमध्ये? कधी आमच्या सपोर्टने, कधी भाजपच्या सपोर्टने राजकारण करत असतात,' असं म्हणत राणा दाम्पत्यांचं ठाकूर यांनी सर्वच काढलं.

कधी बारदाना चोरला नाही

'हलकटासारखं माझ्या घरी किराणा पाठवला. शाळांमध्ये जे काही तेल वाटलं जातं, तेच या किराणाच्या थैलीमध्ये आहे. परत जर असं केलं, तर चांगलं उत्तर मिळेल. माझ्या वडिलांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली प्रतिष्ठीत घरातली मुलगी आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे करत नाही. तुम्ही जर, असे चिल्लर धंदे करत असाल, तर त्याचे उत्तर आम्हाला देता येतं,' असेही ठाकूर यांनी म्हटले.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे, हरामखोरानो!

'शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे, हरामखोरानो! असा आमचा अपमान खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना काय मदत करायची ती करा. त्यांना मदतीचे पैसे देता येईना, अन् अशा इथं भानगडी करता. हे चिल्लर धंदे तत्काळ बंद झाले पाहिजे,' असा सूचक इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT