Amravati Crime News: एकीकडे राज्यात अशोक खरात प्रकरणानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणापाठोपाठ आता अमरावती हादरली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका 19 वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
तब्बल 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याला सोमवारी (ता.13) उशिरा रात्री अटक केली आहे.आता याप्रकरणात सर्वात धक्कादायक बाब समोर येत आहे.
अमरावतीमधील परतवाडा येथील मुख्य आरोपी अयान अहमद याने परिसरातील 150 हून अधिक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता संबंधित तरुणींचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केले जात आहे. आता मुख्य आरोपी अयान अहमद हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
खासदार अनिल बोंडे यांनी अमरावतीमधील लैंगिक शोषण घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी(ता.13) भाजप शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडू,असा थेट इशारा बोंडे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर म्हणून पोलिसांच्या तपासाची सूत्रे वेगानं फिरली आणि रात्री उशिरा आरोपी अयान अहमद याला अटक करण्यात आली आहे.
परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. खासदार अनिल बोंडे यांनी याप्रकऱणात धक्कादायक माहिती देताना, आरोपी अयान तन्वीर याच्याकडून तब्बल 180 हून अधिक तरुणींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोपही केला आहे. तसेच त्यांनी 350 व्हिडीओ व्हायरल झाल्याचंही म्हटलं आहे.
अयान अहमद तनवीर अहमद (19, रा. परतवाडा) याने काही मुलींशी जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले होते. त्याने याच फोटो आणि व्हिडीओच्या आधारे तरुणींना धमकावत ब्लॅकमेल केल्याचंही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली होती. भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास समोर येत नव्हते. पण आता पोलिसांनी पीडितांनी या प्रकरणात तक्रार देण्यास समोर यावं असं आवाहन केलं आहे. पीडितांची सर्व ओळख गोपनीय ठेवण्यात येईलं,असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अयान अहमद तनवीर अहमद हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. तो एमआयएमचे शहराध्यक्ष माजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना दिसत असल्याची माहिती काही फोटो आणि व्हिडिओमधून समोर आलं आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत स्पष्टता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.