Beed News : बीडमधील तरुण तहसिलदाराचा अपघात की घातपात? : 'एका' कारणामुळे राकेश गिड्डेंच्या मृत्यूबद्दल संशय वाढला

Beed News : बीडमधील केजचे तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.
Questions raised over Tahsildar Rakesh Gidde’s death as organizations demand thorough investigation into whether the incident was accidental or planned.
Questions raised over Tahsildar Rakesh Gidde’s death as organizations demand thorough investigation into whether the incident was accidental or planned.Sarkarnama
Published on
Updated on

Tahsildar Rakesh Gidde Death : बीड जिल्ह्यातील केजचे तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकूल वातावरण आहे. पण आता त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात होता की तो घातपात होता? यावर चर्चा सुरु झाली आहे. संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीनेही या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. तहसिलदार दुलाजी मेंडके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या दोन्ही निवेदनात केली आहे.

प्रामुख्याने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून तहसिलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल व महत्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? असा संशय बळावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात संशय राहू नये, यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Questions raised over Tahsildar Rakesh Gidde’s death as organizations demand thorough investigation into whether the incident was accidental or planned.
Kej Tehsildar Accident : बीड जिल्ह्यातील तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू; लातूर-अंबाजोगाई मार्गावर भीषण दुर्घटना

राकेश गिड्डे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत जनतेमध्ये विविध शंका निर्माण होत असून हा अपघात की घातपात? याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल व महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे.

भीषण कार अपघातात निधन :

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिल रोजी झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला होता.

Questions raised over Tahsildar Rakesh Gidde’s death as organizations demand thorough investigation into whether the incident was accidental or planned.
Beed News : पराभव जिव्हारी लागला, वचपा काढला; भाजप नगरसेविकेच्या पतीला बेदम मारहाण

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com