Amravati Teachers Constituency Sarkarnama
विदर्भ

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला गुडन्यूज मिळणार? किरण सरनाईक यांच्याविरोधात निकाल जाण्याची शक्यता

Amravati Teachers Constituency: राज्यातील पाच विभागातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक आज पार पडली. यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत.

Amit Ujagare

Amravati Teachers Constituency: राज्यातील पाच विभागातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक आज पार पडली. यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला गुडन्यूज मिळणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. तर महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात निकाल जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या कुठल्या गोष्टींचा फटका महायुतीला बसू शकतो जाणून घेऊयात.

साम टीव्हीचा एक्झिट पोल

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनं अनेक विभागांमध्ये धक्कादायक निकालाचं भाकीत केलं आहे. यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपातील अनेकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळं मतांच्या फुटीमुळं या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते. महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सुटली होती, सेनेचे उमेदवार किरण सरनाईक हे उमेदवार आहेत.

महायुतीकडून चार जणांची बंडखोरी

सामटीव्हीच्या वृत्तानुसार, अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण २६ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यापुढे चार बंडखोर उमेदवारांचं आव्हान होतं. यामध्ये भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगिती शिंदे, भाजपाचे आमदार राजेश वानखेडे यांचे मेव्हणे शेखर कोळेकर आणि सुमीत पवार तर दुसरीकडं शिंदेसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी केली होती.

पोहरेंचं पारडं जड

तर दुसरीकडं महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने आणि काँग्रेसच्या आदिती पोहरे या इथं उमेदवार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख हे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. आदिती पोहरे या त्यांच्या कन्या आहेत. या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळाली, तसंच महायुतीच्या उमेदवारांना चार बंडखोरांचा सामना करावा लागणार असल्यानं महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT