BJP MP Anil Bonde Sarkarnama
विदर्भ

Transgender conversion to Islam : तृतीयपंथीयांचं बळजबरीनं इस्मालमध्ये धर्मांतर; खासदार बोंडे संतापले, रॅकेट असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलं

Amaravati Transgender Conversion to Islam BJP MP Anil Bonde Makes Serious Allegations : अमरावतीमधील तृतीयपंथीयांचं बळजबरीनं धर्मांतर होत असल्याच्या प्रकारावर खासदार अनिल बोंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Anil Bonde allegations : राज्यात धर्मांतरावरून सत्ताधारी नेहमीच आक्रमक असतात. आता हा प्रकार तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचला आहे. अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांचं बळजबरीनं धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे. तृतीयपंथीयांनी याची तक्रार राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्याकडे केले.

हिंदू तृतीयपंथीयांचे बळजबरीने इस्लाम धर्मात धर्मांतराचे अमरावतीत सुरू आहे. हे रॅकेट असून, याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितले.

अमरावतीमधील हिंदू तृतीयपंथीयांचं बळजबरीनं इस्लाम धर्मात धर्मांतर करत असल्याचा प्रकार समोर आला. याबाबत हिंदू (Hindu) तृतीयपंथीयांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांची भेट घेत तक्रार केली. या प्रकारावर खासदार बोंडे चांगलेच संतापले. तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी यांनी जिहादी प्रवृत्तीकडून जीवला धोका असल्याचे म्हटले.

भाजपचे (BJP) खासदार अनिल बोंडे म्हणाले, अमरावती शहरातील हिंदू तृतीयपंथीयांचं 2023 मध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यात आलं. कुंभमेळ्यावेळी त्यांनी धर्म वापसी केली. घर वापसी केली. याच राग म्हणून, मुस्लिम तृतीयपंथीयांनी हिंदू तृतीयपंथीयांच्या घरावर हल्ला केला. तसंच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.

इतर हिंदू तृतीयपंथीयांना देखील जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातो आहे. धमक्या दिल्या जात आहेत. घरण्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हिंदू तृतीयपंथीयांच्या मागे ऑटो रिक्षा लावल्या जात आहेत. त्यामुळे मुस्लिम युवक असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकाराचा अहवाल पाठवणार आहे. तसंच पोलिस महानिरीक्षकांना देखील कारवाईसंदर्भात सूचना करणार आहे.

आता हे नवीन रॅकेट समोर आलं

हिंदू तृतीयपंथीयांना धमकावण्यासाठी तलवारीनं हल्ला केला आहे. आतापर्यंत मुलींच लव जिहाद ऐकत होतो, लँड जिहाद ऐकत होतो, आता तृतीयपंथीयांमध्ये देखील बळजबरीने धर्मांतराचे रॅकेट, अमरावतीमध्ये समोर आलं आहे. हा प्रकार भयावह असून, याच्या बंदोबस्ताची मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

आखाड्याच्या नंदगिरी म्हणाल्या...

तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी म्हणाल्या की, "मला जिहादी प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवाला धोका आहे. माझं 2023 मध्ये धर्मांतर केले होते. परंतु 2025मध्ये कुंभमेळ्यात मी पुन्हा हिंदू धर्मात आले. तिथं मला आखाड्याचं महामंडलेश्र्वर बनवलं. मी धर्मांचं काम करत आहे. मंदिर बांधत आहे. परंतु मला मंदिर बांधण्यापासून थांबवलं जात आहे. मशीद किंवा दर्गा बसवण्याचं मला सांगितलं जात आहे. परंतु आज माझ्यावर हल्ला केला. मिरची पूड टाकून, तलवारीने हल्ला केला. तिथं पोलिस देखील होते. पण कारवाई केली नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT