Yashomati Thakur, Ravi Rana, Navmneet Rana Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur News: यशोमती ठाकूर-राणा यांच्यातील वाद पुन्हा भडकणार? ठाकूर म्हणाल्या, "खोटे जात प्रमाणपत्र..."

Navneet Rana Vs Yashomati Thakur : आजही एखादी निवडणूक आली तर आम्हाला एखादं वावर विकावं लागतंय."

Mangesh Mahale

Amravati Political News: खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हं आहेत. राणा दाम्पत्यांनी केलेल्या आरोपांवर आता यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली. या जनसंवाद यात्रेचा समारोप कुऱ्हा येथे झाला. या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करीत महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी व भ्रष्टाचाराची प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.

यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली. "नवनीत राणा यांनी मला अपशब्द वापरला, पण त्या कोण आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्यासाठी आम्ही मेहनत घेतली. पण खोटे जात प्रमाणपत्र घेऊन आम्ही गेलो नाही," अशी सडकून टीका यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांवर केली.

यशोमती ठाकूर यांच्यावर नवनीत राणांनी जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला यशोमती ठाकूरांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "माझ्या बापाने आणि आम्ही जमिनी देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं नाही. निवडणुकीवेळी मी पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आजही एखादी निवडणूक आली, तर आम्हाला एखादं वावर विकावं लागतंय."

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा...

अमरावतीत सध्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेवर खासदार नवनीत राणा यांनी टीका केली होती. याचवेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खासदार राणा म्हणाल्या, सध्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी यशोमती ठाकूरही त्यांच्यासोबत भाजपमध्ये येणार होत्या, असा दावा खासदार राणा यांनी केला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT