Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार: धाराशिव, लातूरमधून इच्छुकांच्या आशा पल्लवित; चौगुले, निलंगेकर, की राणाजगजितसिंह...

Maharashtra Politics : राणाजगजितसिंह पाटील हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
Ranajagjitsinh Patil, Sambhaji Patil Nilangekar, dyanraj Chougule
Ranajagjitsinh Patil, Sambhaji Patil Nilangekar, dyanraj ChouguleSarkarnama

Dharashiv News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील प्रबळ दावेदार आणि इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या आशेला पालवी फुटते की, पुन्हा निराशाच पदरी पडते, हे लवकरच स्पष्ट होईल.

हे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडत गेला. सत्तेत तिसरा पक्ष भागीदार झाल्यामुळे विस्ताराबाबत सरकारच्या अडचणी वाढत गेल्या. आता या टप्प्यात १४ जणांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपकड़ून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना पहिल्याच विस्तारात मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती.

Ranajagjitsinh Patil, Sambhaji Patil Nilangekar, dyanraj Chougule
Pankaja Munde News : भाजपची खेळी? प्रीतम मुंडेंना डावलून पंकजाताईंना लोकसभेची ऑफर? पंकजा म्हणाल्या, 'माझं उत्तर मी शोधलंय...'

पहिल्या विस्तारात शिवसेनेचे (शिंदे गट) भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजी सावंत यांना संधी मिळाली. सावंत या मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार ज्ञानराज चौगुले यांना मात्र संधी मिळाली नाही. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुरुवातीपासूनच अत्यंत विश्वासू समजले जातात. तरीही आतापर्यंतच्या विस्तारात चौगुले यांना डावलण्यात आले.

प्रबळ दावेदार असलेले भाजपचे आमदार पाटील आणि शिवसेनेचे चौगुले यांनी डावलेले जाऊनही कधीही तक्रार किंवा तक्रारवजा सूर व्यक्त केला नाही. विस्ताराच्या चर्चेने समर्थकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून निलंग्याचे आमदार, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे प्रबळ दावेदार आहेत. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार निलंगेकर आणि आमदार पवार यांच्यात फारसे सख्य नाही. असे असले तरी लातूर जिल्ह्याला संधी मिळाली तर निलंगेकर यांचीच वर्णी लागू शकते. निलंगेकरांना डावलून पवारांना संधी देण्याचे धाडस भाजप दाखवणार नाही.

मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सवापूर्वी होईल, असेही तटकरे यांनी जाहीर करून टाकले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे जनतेला वाटते, असा शोध तटकरे यांना लागला आहे. १४ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणार आहे. त्यात काय होईल, हे आताच ठामपणे सांगणे अवघड आहे, मात्र तटकरेंच्या या वक्तव्यांच्या टायमिंगमुळे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Ranajagjitsinh Patil, Sambhaji Patil Nilangekar, dyanraj Chougule
CM Eknath Shinde News : मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य अपेक्षित, राजकारण न करण्याची शिंदेंची साद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com