Amruta Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Amruta Fadnavis Garba Muslim : गरबा उत्सवावरून भाजपमध्येच मतभेद? नीतेश राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद

Amruta Fadnavis takes an inclusive stand on Garba amid Nitesh Rane's controversial remarks : ‘गरबा सर्वांसाठी खुला; मुस्लिम व्यक्ती पाहण्यासाठी येत असेल तर गैर काय?’ अमृता फडणवीसांचा सवाल; दहीहंडी आणि DJ बाबतही स्पष्ट भूमिका

Pradeep Pendhare

Garba Muslim Entry : सत्ताधारी महायुतीमधील भाजप मंत्री नीतेश राणे यांनी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले आहे.

या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंत्री राणे यांच्या पेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे. एकप्रकारे मंत्री राणेंच्या भूमिका छेद देणारी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी, गरबा सर्वसमावेशक उत्सव असून, तो पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी मुस्लिम (Muslim) व्यक्ती येत असेल, तर त्यात गैर काहीही नाही,’ अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली. चंद्रपुरातील महाशिवलिंग मंदिरात आयोजित रुद्राभिषेकासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गरबा, दहीहंडी, सार्वजनिक उत्सव आणि डीजेच्या वापराबाबतही भूमिका स्पष्ट केली.

गरबा सर्वांसाठी खुला उत्सव आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी येत असेल, तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असे फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या. श्रद्धा, धर्माचे पालन घरात करावे, सार्वजनिक ठिकाणी मात्र सर्वांनी सामाजिक सलोखा आणि नियमांचे भान ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहीहंडी उत्सवात महिलांच्या सहभागाबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महिला मानवी मनोरा उभारून दहीहंडीत सहभागी होत असतील, तर ते समानतेचे प्रतीक आहे. मात्र, महिलांना अयोग्य पद्धतीने नृत्य करण्यास प्रवृत्त करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धर्म आणि श्रद्धा जपताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत अमृता फडणवीस यांनी डीजेवर पूर्ण बंदी घालण्याची गरज नाही, तर नियमानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेतच तो वाजवला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT