Devendra Fadanvis sarkarnama
विदर्भ

Andheri East : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होणार? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा पोटनिवडणूक आज (ता. १०) (by-election) जाहीर झाली.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा पोटनिवडणूक आज (ता. १०) (by-election) जाहीर झाली. शिवसेनेचे (Shivsena) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीमध्ये शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाने माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट असणार आहे.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी अंधेरी पूर्व निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, शिवसेनेकडून प्रस्थाव आला तर बघू विचार करु, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

त्यामुळे चर्चांना उधान आले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. लटके यांच्या निधनामुळे जाहीर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिंदे गट त्या जागेवर दावा करीत आहे. लटकेंचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढू नये, असा मतप्रवाह शिंदे गटातील काही नेत्यांचा असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT