मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council) राज्यपाल (governor) नियुक्त १२ आमदारांच्या (MLA) यादीतून मला डावललं तर मी राज्यपालांवर केस करेन. मी गप्प बसणार नाही. कारण, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता आणि गायक आहे, असे आव्हान ज्येष्ठ गायक आणि राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोट्यातून शिफारस झालेले आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. (I will file a case against governor if my name is removed from the list of MLAs : Anand Shinde)
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने नवी यादी दिली आहे. त्याबाबत बोलताना आनंद शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिंदे यांची कलावंतांच्या कोट्यातून राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
आनंद शिंदे म्हणाले की, कोणतीही यादी देऊ द्या. राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार निवडीच्या निकषांत मी बसतोय. पहिलं महाविकास आघाडी सरकारसुद्धा निकषांत बसणारं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धरूनच ते सरकार सत्तेवर आलं होतं. महाविकास आघाडी सरकारने जी नावं दिली होती, त्यात मी निकषात बसणारा आहे, त्यामुळे माझी नियुक्ती होणार नाही, असं होऊच शकत नाही.
शिंदे सरकारने पहिली यादी रद्द करू अथवा काहीही करू. पहिली यादी मंजूर का करत नाही आहात, याचं उत्तर तर राज्यपालांना द्यावंचं लागणार आहे. या यादीतील व्यक्ती कोणत्या निकषांत बसत नाहीत. मी जर निकषात बसत नसेल तर माझे नाव त्यातून काढलं तर हरकत नाही. पण, आंबेडकरांचं संविधान आहे, त्यामुळे राज्यपालांना प्रथम पहिल्या यादीचाच विचार करावा लागणार आहे, असे सूचक वक्तव्यही शिंदे यांनी केले.
देशात बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सर्वांत मोठं आहे. त्या संविधनावर माझा भरोसा आहे. या प्रकरणी राज्यपालांवर केस झालेलीच आहे. मी काय करण्याची गोष्टच येत नाही, असेही आनंद शिंदे यांनी शेवटी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.