Anil Deshmukh Nagpur
विदर्भ

Anil Deshmukh News : 'ती' गर्दी बघून भाजप नेते धास्तावले, म्हणून मैदानाचे राजकारण सुरू !

BJP : क्षुल्लक गोष्टींसाठी भाजपने काही लोकांना पुढे केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. तेथे उसळलेल्या गर्दीचा धसका भाजप नेत्यांनी घेतला आहे. एकीकडे त्यांच्या सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या राहात असताना मविआच्या सभा दणदणीत होत आहेत. त्यामुळे सभेसाठी मैदान न देण्यासारख्या क्षुल्लक गोष्टींसाठी भाजपने काही लोकांना पुढे केले आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. (BJP has promoted some people for trivial things)

१६ एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दर्शन कॉलनीतील मैदानावर होणार आहे. परंतु या मैदानाचा राजकीय वापर केला जात असून परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी काल भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर अनिल देशमुखांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

भाजप कार्यकर्त्यांनी सभास्थळी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे या सभेवरून भाजप-मविआ आमने-सामने येण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.

नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी देण्यात आलेल्या मैदानावरून भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केला आहे. खेळाची मैदाने राजकीय सभेसाठी देऊ नका, परवानगी रद्द करा, असे पत्रच त्यांनी नासुप्र सभापतींना दिले आहे. महाविकास आघाडीनेही या मैदानावर सभा होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मैदान परिसरात आंदोलन केले.

एवढेच नव्हे तर मैदान सभेसाठी देण्याबाबत परवानगी रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप व मविआ संघर्षाचे चित्र आहे. रविवारी भाजपचे माजी नगरसेवक व नागरिकांनी या मैदान परिसरात आंदोलन केले. या मैदानावर सभेसाठी दिलेली परवानगी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन व हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी दिला.

यावेळी धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, वंदना भुरे, मनीषा कोठे, राजेंद्र गोतमारे, समिता चकोले, पिंटू गिऱ्हे, विजय ढोले, सचिन वानखेडे, अजय सराडकर, दिव्या धुरडे, अनिल राजगिरे, हेमंत आखरे, मंगेश साखरकर, आशिष कलसे, इब्राहिम चिडीवाले, शंकर गायधने, पप्पू सातपुते, संगिता आदमाने, अनधा आमले, मिना चरपे आदींनी नागपूर सुधार प्रन्यास प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

सुनील केदार यांनी केली पाहणी..

दरम्यान, भाजपचे आंदोलन झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपातील माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नरेंद्र जिचकार, विजय वनवे, प्रशांत ढोक उपस्थित होते.

सहा नेते करणार मार्गदर्शन..

मविआच्या वज्रमूठ सभेसाठी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत जंगी सभेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. प्रत्येक पक्षाचे दोन नेते सभेला मार्गदर्शन करतील, असे माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या मैदानाची क्षमता मोठी आहे. मविआच्या (Mahavikas Aghadi) सर्व नेत्यांनी पाहणी करून सभेसाठी मैदान निश्चित केले. सभेसाठी रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेतील गर्दीचा धसका भाजपने (BJP) घेतला आहे. त्यामुळे भाजप काही लोकांना पुढे करून विरोध करीत आहे, असे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT