Anil Deshmukh News : देशमुखांच्या निमित्ताने भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन

Nagpur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांचे केलेले स्वागत पाहून देशमुखही भारावले
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

NCP News : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच नागपूर विमानतळावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांचे केलेले स्वागत पाहून देशमुखही भारावले.

भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये भाजप वरचढ आहे. मात्र, आगामी निवडणुका पाहता राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Anil Deshmukh
Ncp News : राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी!

अनिल देशमुख हे त्यांच्या होम ग्राऊंडवर तब्बल २१ महिन्यांनी आले. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नागपूरमध्ये लक्ष घालण्याची शक्यता आहे. यातच आता अनिल देशमुखही विदर्भ आणि नागपूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात. असेच काहीसे उदाहरण आजच्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसले.

Anil Deshmukh
Konkan News : कोकणात पुन्हा भाजपचा शिवसेनेला धक्का; सत्ता राखण्यात मिळवले यश

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना ईडी आणि सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तब्बल 14 महिन्यानंतर जामीन मिळाला. मात्र, मुंबईतून तीन महिने बाहेर जाता येणार नाही अशी अट न्यायालयाने ठेवली होती. त्यानंतर देशमुखांनी मुंबई बाहेर जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ते आज नागपूरला आपल्या मतदारसंघात दाखल झाले.

Anil Deshmukh
Chinchwad By Election : राष्ट्रवादीने केला करेक्ट कार्यक्रम; इच्छूकालाच केले प्रचारप्रमुख

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात 'टायगर इज बॅक'चे पोस्टर झळकवले. यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, ''21 महिन्यानंतर मी नागपुरात आलो आहे. त्यामुळे मला नागपुरात येऊन आनंद झाला आहे.

मला खोट्या गुन्ह्यामध्ये आत टाकण्यात आले होते. पण आता स्वगृही परतल्यामुळे आनंद झाला आहे'', असं म्हणत देशमुख भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, 21 महिन्यांनी अनिल देशमुख हे आपल्या मतदारसंघात दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com