Balasaheb Thackeray, Anil Parab, EKnath Shinde
Balasaheb Thackeray, Anil Parab, EKnath Shinde  Sarkarnama
विदर्भ

'' बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा...'' अनिल परबांचं आव्हान ; शिंदेंचाही पलटवार, म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Winter session : शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. दोन्ही बाजूकडून टीकेची एकही संधी सोडली जात नाही. हेच चित्र सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेच्या सभागृहात देखील पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.

विधान परिषदेच्या सभागृहात ठाकरे गटाचे नेते व आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केले. परब म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब, तुमच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. कारण आपण शिवसेनेतून बाहेर पडलेल्या 40 आमदार आणि 13 खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. पण, बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की, आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही. शिंदे गटातील किती लोकं भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

तुमच्या जीवावर लढा. आम्हाला हरवा. आम्ही तुमचं स्वागत करू. कारण आम्ही देखील तेवढ्याच टोकाचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही आम्हांला हरवलंत तर अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपच्या मदतीनं हरवलं तर आम्हाला दुःख वाटेल अशा शब्दांत अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परबांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, आपण आमची चिंता करू नका. परंतू, तुम्ही निवडून आलात तेव्हा तुम्हांला भाजपचीच मदत लागली. जे आमदार, खासदार तिकडं उरले आहेत. त्यांनीही निवडणुकीत मोदींचा फोटो लावला होता.

आणि ज्यादिवशी तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलात त्या दिवसांपासून बाळासाहेबांवर बोलण्याचा तुम्हांला अधिकारच नाही शिवाय बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा देखील अधिकार नाही. तो अधिकार आम्हांला आहे असाही पलटवार शिंदे यांनी परबांवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT