APMC Amravati Sarkarnama
विदर्भ

APMC Election : जागावाटपात अन्याय झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुखांनी लढवले स्वतंत्र पॅनल !

Shivsena : जागावाटपात हा सेनेवर झालेला अन्याय आहे.

सरकारनामा ब्यूरो

Amravati APMC Election News : गतवेळी संचालक मंडळात सहा उमेदवार शिवसेनेचे होते. यावेळी महाविकास आघाडी असताना केवळ दोन जागा देण्यात आल्या. जागावाटपात हा सेनेवर झालेला अन्याय आहे. त्यामुळे त्याविरोधात आम्ही बळीराजा पॅनल तयार करून दहा उमेदवार रिंगणात उतरविल्याचे स्पष्टीकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले. (Last time six candidates were from Shiv Sena in the Board of Directors)

आमच्या पॅनलमधून निवडून आलेले उमेदवार नंतर महाविकास आघाडीला समर्थन देतील असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत बळीराजा पॅनल तयार केले असून दहा उमेदवार उभे केले आहेत. पॅनल उभे करण्यामागील भूमिका सुनील खराटे म्हणाले, या निवडणुकीत सेवा सहकारी मतदारसंघातून सहा व ग्रामपंचायत मतदारसंघातून चार उमेदवार रिंगणात आहेत.

पाच उमेदवार मिळाले नसले तरी सर्व उमेदवार निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) असून उच्च शिक्षित व नवखे आहेत, पण शेतकरी आहेत. पॅनेल उभे करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, आम्ही महाविकास प्रणीत सहकार पॅनलमध्ये गतवेळप्रमाणे सहा जागांची मागणी केली होती. त्यांनी केवळ दोन जागा देण्याचे मान्य केले, त्यामुळे नाइलाजाने स्वतंत्र पॅनल तयार करून रिंगणात यावे लागले.

ऐनवेळी तयारी करावी लागल्याने व भाजपसह (BJP) इतर विरोधी पक्षांसोबत युती न करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने पूर्ण संख्येने उमेदवार मिळू शकले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या चार जागा जरी निवडून आल्यात तरी तो आमचा मोठा विजय राहणार आहे.

विजय मिळाल्यास बाजार समितीमधील (APMC Election) लिलाव १० रुपयांच्या फरकाने करणे, मातेरा सांडणार नाही याची व्यवस्था करणे, समितीच्या आवारात शेड उभे करणे, दलालांना ताडपत्री ठेवणे व खाली माल ठेवण्यासाठी चौकट ठेवणे बंधनकारक करणे, बाजार समितीत सोलर पॅनल उभारून वीज देयक कमी करणे, कर्मचारी नियुक्तीत आत्महत्याग्रस्त शेतकरी (Farmers) कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य, चोरी रोखणे, शेतकऱ्यांसमोर लिलाव करणे व कापूस विक्री बाजार समितीच्या आवारात करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. खराटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला बाळा तळोकार, पराग गुडधे व सर्व १० उमेदवार उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT