Akola District Barshitakali APMC Election : अकोला शहरापासून जवळच असलेल्या बार्शीटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अनेकांनी आपली उमेदवारी दाखल करून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केली. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल व वंचित बहुजन आघाडीमध्ये संयुक्त युती झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. (The Dhabekar group is struggling to maintain its winning streak)
बाजार समितीच्या स्थापनेपासून बार्शीटाकळी बाजार समितीवर धाबेकर व लहाने गटाचे वर्चस्व राहिले आहे. मागील वेळीसुद्धा याच गटाचे सभापती येथे विराजमान होते. पण यावेळी धाबेकर गटाला विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी झुंजावे लागत आहे. कारण अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घट्ट पकड असलेल्या वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापितांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही निवडणूक धाबेकर गटासाठी सोपी नाही, हे निश्चित.
वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलसोबत वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) युती झाली आहे. त्यामुळे पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मतदारांनी परिवर्तन पॅनलचे प्रमुख विनोद थुटे व समीर विखे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रचाराची दिशा ठरवावी, असे युतीच्या वतीने एक पत्रक काढून जाहीर करण्यात आले आहे.
बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीची व्याप्ती मोठी असून, तालुक्यातील पिंजर येथे उपबाजारसुद्धा आहे. शेतकऱ्यांकडून (Farmers) येणारा शेतमाल अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांकडून खरेदी करणे, गुरांचा आठवडी बाजार भरवून गुरांची खरेदी-विक्री हे बाजार समितीचे उत्पन्न वाढीचे प्रमुख स्रोत आहेत.
धाबेकर व लहाने गटाचे वर्चस्व..
बाजार समितीच्या (APMC) स्थापनेपासून प्रामुख्याने धाबेकर व लहाने गटाचे वर्चस्व या समितीवर दीर्घकाळ होते, हे विशेष. एकूण १८ जागांसाठी मतदान होणार असून, या १८ उमेदवारांना निवडून देण्यासाठी एक हजार ७१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रवर्ग ६९७, व्यापारी/अडते ३१, हमाल/मापारी ६५, सेवा सहकारी संस्था ९२५ असे मतदार आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.