Kishor Jorgewar Sarkarnama
विदर्भ

Jorgewar : सुरजागडचे लोहखनिज विदर्भाबाहेर विकण्यास सरकार बंदी घालणार ?

Surajagad : उत्खननाचे कंत्राट मिळवणारी कंपनी आता येथील 90 टक्के लोहखनिज विदर्भाच्या बाहेर विकत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Winter Session : विदर्भात (Vidarbha) उद्योग लावत विदर्भातच लोहखनिज वापरण्याच्या अटीवर सुरजागड येथील लोह खनिज उत्खननाचे कंत्राट मिळवणारी कंपनी आता येथील 90 टक्के लोहखनिज विदर्भाच्या बाहेर विकत आहे. ही गंभीर बाब असुन नियमांची पायमल्ली करणाऱ्या या कंपनीवर विदर्भाबाहेर बेकायदेशीर लोहखनिज विकण्यावर बंदी घालनार आहात का, असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.

चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchroli) या दोन जिल्ह्यांत मोठी खनिज संपत्ती आहे. मात्र येथील खनिज संपत्ती उत्खणन करणाऱ्या कंपनीवर अंकुश नसल्याने याचा कोणताही फायदा या जिल्ह्यांना झालेला नाही. या लोहखनिजावर आधारीत रोजगार वाढीसाठी कोणतेही छोटे उद्योग सदर जिल्ह्यांमध्ये उभे राहु शकले नाही. असेही आमदार जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी म्हटले आहे.

घुग्घुस येथील लॉयड्स मेटल या कंपनीला लागणाऱ्या खनिजाची गरज पूर्ण करण्याकरिता सुरजागड येथील खाण त्यांना देण्यात आली आहे. यावेळी येथील लोहखनिज लॉयड्स मेडल कंपनीसह उर्वरित लोहखनिज विदर्भातील छोट्या उद्योगांना देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आता सदर लोहखनिज प्रकल्पातून निघाणारे केवळ १० टक्के लोहखनिज येथे वापरले जात असुन ९० टक्के लोहखनिज विदर्भाबाहेर विकले जात आहे. त्यामूळे विदर्भात लोहखनिजावर आधारीत उद्योग वाढण्यास अडचण निर्माण झाली असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.

सभागृहात बोलतांना ते म्हणाले की, विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहे. आमच्याकडे कोळशाच्या खाणी आहेत. सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरु आहे. विपूल प्रमाणात खनिज संपत्ती असुनसुध्दा विदर्भ मागास राहिला आहे. सुरजागडला असलेली खाण लॉयड्स मेटल या कंपनीला मिळाली आहे. मात्र येथुन निघणारे लोहखनिज येथे वापरण्यापेक्षा ते बाहेर विकण्यावर अधिक भर दिला जात आहे.

येथे उद्योग उभारण्यासाठी ही माईन्स सुरु करण्यात आली आहे. मात्र केवळ १० टक्के लोहखनिज वापरतात बाकी ९० टक्के लोहखनिज विदर्भाबाहेर विकले जात आहे. या प्रकारावर सरकार बंदी आणणार आहे का, असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. चंद्रपूर गडचिरोली येथे मोठे लोहखनिज प्रकल्प सुरु करत भिलाईच्या धर्तीवर चंद्रपूर-गडचिरोलीत स्टिलनगर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लॉयड्स, गोपानी, सिध्दबली आणि ग्रेस हे लोहखनिजावर आधारीत असलेले चार उद्योग चंद्रपूर मतदार संघात आहेत. तसेच विद्युत निर्मिती करणारे प्रकल्पही चंद्रपूरात आहे. मात्र विद्युत निर्मिती करणाऱ्या धारीवाल कंपीनीची विज परवडत नाही, म्हणून महाराष्ट्र शासन त्यांची वीज विकत घेत नाही. परिणामी तो उद्योग तोट्यात आहे. तर त्याच्या लगत असलेला सिध्दबली उद्योगाला महाराष्ट्र शासनाची वीज परवडत नाही. म्हणून हा लोहखनिजावर आधारीत असलेला उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेत रोजगार वाढीसाठी लोहखनिजावर आधारित असलेल्या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन देण्याची मागणीही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT