नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पदस्पर्शाने चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली आहे. नागपूर नंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली. नागपूर (Nagpur) येथील दीक्षाभूमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी उपेक्षीतच राहिली. या दीक्षाभूमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचाही विकास व्हावा, अशी मागणी चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी केली.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पुरवणी मागणीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर (Chandrapur) येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची मागणी केली असून येथे संविधान भवनाची निर्मिती करण्याचीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या अधिवेशनातही हा विषय त्यांनी लाऊन धरला होता.
काल पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी ते म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दोन ठिकाणी दीक्षा देण्याचा कार्यक्रम घेतला होता. दीक्षाभूमी नागपूरला आणि चंद्रपूरला आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास मात्र झालेला नाही. त्यामुळे कमीत कमी ५० कोटी रुपये तरी शासनाने या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता द्यावे.
स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण यावर्षी साजरा करतो आहे. ७५ वे वर्ष सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे एक सुंदर संविधान भवन चंद्रपूरमध्ये व्हावे, अशी पूर्व विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यामुळे येथे संविधान भवन निर्माण करण्यात यावे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.