Arni APMC Election Sarkarnama
विदर्भ

Arni APMC Election : आर्णी बाजार समिती निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले सख्खे काका-पुतणे...

Ramji Ade : रामजी आडे म्हणतील तेच कॉंग्रेस पक्षात होत होते.

सचिन शिंदे

प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, ही म्हण आपल्याला चांगली तोंडपाठ आहे. ही म्हण राजकारणात लागू पडते. त्यामुळे प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य असतं, ही नवी म्हण तयार झाली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

जे चित्र काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात बघायला मिळाले. अगदी तशीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्येसुद्धा पहायला मिळत आहे. आता सत्तेसाठी काही पण होताना दिसत आहे. सत्ता म्हटली की कोणाचीही गय केली जात नाही, हे आर्णीचे काका-पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे.

आर्णी तालुक्यात कॉंग्रेस पक्षातील एकनिष्ठ आणि सर्वांना आपलासा वाटणारा नेता म्हणजे स्व. रामजी भावसींग आडे होते. रामजी आडे म्हणतील तेच कॉंग्रेस पक्षात होत होते. त्यांनी अनेक पदे भूषविली. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अनिल आडे राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी सुद्धा आर्णी शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला.

अनिल आडे यांच्यानंतर त्यांची पत्नी माधुरी आडे यांनी यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. त्यांना राजकीय वारसा आहे. यावेळी अनिल आडे यांनी आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडी या पॅनलकडून उमेदवारी दाखल केली आहे.

त्यांना रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकत्र येऊन शेतकरी परिवर्तन विकास आघाडी पॅनलमध्ये खेड येथील माजी सरपंच तुकाराम भावसींग आडे म्हणजेच अनिल आडे यांचे काका यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

याविरोधात भाजप, (BJP) शिवसेना-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व मनसे (MNS) यांचे उमेदवार असून सर्वसाधारण गटासाठी ही निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) काका - पुतण्याच्या लढतीकडे तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. कोण कुणावर भारी पडेल, हे मतमोजणीअंती कळणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT