APMC Arni : मविआतील असंतुष्ट, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि आणि भाजप-शिंदे गटांत होणार तुंबळ लढाई !

Mahagaon : निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.
Arni APMC
Arni APMCSarkarnama

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तीन गटांमध्ये घमासान होणार असून निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेना - उद्धव बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे काही नेते यांची शेतकरी परिवर्तन विकास आघाडी.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी विकास आघाडी तर भाजप, शिवसेना - एकनाथ शिंदे यांचे शेतकरी न्याय हक्क आघाडी पॅनल या तीन गटांमध्ये चुरसीची लढत आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.

जो करू शकतो खर्च त्याचाच राहिला उमेदवारी अर्ज...

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आज म्हणजे २० एप्रिल हा महत्वाचा दिवस होता. इच्छुक उमेदवारांनी भरलेले नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारांना माघारी खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची आज चांगलीच धडपड पहायला मिळाली.

तालुक्यातील मोठमोठे नेते सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या गाडीवर बसून दुय्यम निबंधक कार्यालयात आणत होते आणि भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या करत होते. ‘पक्षासाठी काम करा, तुमचा पुढे कुठे ना कुठे फायदा होईल’, असे आश्वासन देताना नेते दिसत होते. नेत्यांच्या मनधरणीमुळे अनेक इच्छुकांना मनाचा मोठेपणा दाखवून बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

Arni APMC
APMC Mahagaon : महागाव बाजार समितीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीयांची वज्रमूठ !

सर्वसाधारण घरातील उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाले. केवळ धनदांडग्यांचीच उमेदवारी कायम राहिली, असे आजचे चित्र आहे. बाजार समितीमध्ये मोजकेच मतदार असल्याने ही निवडणूक धनदांडग्या नेत्यासाठीच आहे. त्यामुळे यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची या निवडणुकीवर नजर आहे. सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीने ही निवडणूक लढायची कितीही इच्छा ठेवली तरी खर्च करणारा उमेदवारच निवडणूक रिंगणात टिकेल, म्हणून नेत्यांनी साधारण उमेदवारांना माघार घ्यायला लावली.

Arni APMC
Telhara APMC Election: तापत्या उन्हात उमेदवारांची कसोटी, तालुक्यात खलबते सुरू !

आर्णी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (APMC Election) सर्वच राजकीय (Political) पक्षांसाठी महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी याकडे लक्ष वेधले आहे. बाजार समितीवर सत्ता स्थापन केली की इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. खर्च करा पण बाजार समितीवर सत्ता, आणा ही पक्षांची भूमिका असल्याने तशाच स्वरूपाचे उमेदवार निवडले गेले आहे. पक्षनिष्ठा बाजूला ठेवून अर्थनिष्ठेला या निवडणुकीत प्राधान्य दिले जाणार, हे आजच्या परिस्थितीवरून बघायला मिळाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com