Arni APMC
Arni APMC Sarkarnama
विदर्भ

Arni APMC Election : कॉंग्रेसमध्ये वाढली इच्छुकांची गर्दी, महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत !

Atul Mehere, सचिन शिंदे

APMC Election News : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते व कॉंग्रेसचे काही नेते मिळून एक नवीन गट तयार झाला. तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकत्र येऊन ही निवडणूक लढविविण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत तीन गट निर्माण होतील आणि चुरस वाढेल, याची शक्यता जास्त आहे. (A new group was formed with some Congress leaders)

तालुक्यातील सर्व राजकिय पक्षांतील समोर-समोर करणाऱ्या नेत्यांना कोणते ना कोणते पद पाहिजे असते. त्यातल्या त्यात बाजार समितीचे सभापतीपद महत्त्वाचे मानले जात जाते. ते पद कोणत्या पक्षाला हवे, त्या दृष्टीने उमेदवार निवडून आणायचे आणि सभापतीपद हस्तगत करणे हेच राजकिय पक्ष व त्यांच्या स्थानिक नेत्यांचे उद्दीष्ट आहे.

नामांकन दाखल केल्यानंतर पक्षांतर्गत कलह निर्माण होत असल्याची चर्चा आहे. ही निवडणुक महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गट यांच्या थेट होणार आहे. असे असताना महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली १८ संचालकासाठी कॉंग्रेस आठ राष्ट्रवादी काँग्रेस पाच व उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या गटाला पाच जागा, असे समीकरण ठरले होते.

कॉंग्रेस पक्षातील नेतेच निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांना जास्त जागा पाहिजे आहेत. परंतु हे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व उद्दव ठाकरे शिवसेना यांना हे मान्य नसल्याने महाविकास आघाडी तुटणार, असे संकेत मिळत आहेत. अशा स्थितीत उध्दव ठाकरे शिवसेनेसोबत कॉंग्रेसचे काही इच्छुक व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही इच्छुक मिळुन एक तिसरा गट तयार झाला आहे. परिणामी महाविकास आघाडीमध्ये मोठी दरार निर्माण झाली आहे.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या (APMC Election) हालचालिंना वेग आलेला आहे. १८ संचालकासाठी १६३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. २० एप्रिल रोजी नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत आहे.

सर्वच राजकीय (Political) पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठा आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडताना नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. आर्णी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ही निवडणूक (Election) अत्यंत महत्त्वाची असुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोट बांधनीची ही राजकिय सुरूवात आहे. त्यामुळे संपुर्ण इच्छुकांना सांभाळणे हे राजकिय नेत्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT