Digras APMC News : दोन संजयमध्ये रंगणार निवडणुकीचा सामना; होणार जबरदस्त टक्कर...

Sanjay Deshmukh : संजय देशमुख उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे.
Sanjay Deshmukh and Sanjay Rathod
Sanjay Deshmukh and Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

रामदास पद्मावार

Digras News: माजी राज्यमंत्री व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांची दिग्रस बाजार समितीवर गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे नेते पालकमंत्री संजय राठोड यांनी कंबर कसली आहे. तर ही बाजार समिती हातची जाऊ नये, म्हणून संजय देशमुख यांनी चांगलाच जोर लावला आहे.

या निवडणुकीत दोन संजयमध्ये पुन्हा निवडणुकीचा सामना रंगणार आहे. दिग्गज उमेदवार उभे असल्याने यावेळेस जबरदस्त टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ते ही बाजार समिती हातची जाऊ देणार नाहीत.

खरी लढत सोसायटी गटात..

११ जागा सोसायटी, चार जागा ग्रामपंचायत व तीन जागा व्यापारी-अडते, हमाल-मापारी गटाच्या अशा एकूण १८ जागांकरीता एकूण ८६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत गटात संजय राठोड यांचे वर्चस्व तर व्यापारी-अडते, हमाल-मापारी गटात संजय देशमुख यांचे प्राबल्य असल्याची सहकार क्षेत्रात चर्चा आहे. खरी लढत सोसायटी गटात असल्याचे चित्र सध्या असले तरी यातील काही सोसायट्या बिनविरोध तर काही स्वतंत्र निवडून आल्याने दोन्ही गट संभ्रमात आहेत.

दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस..

बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी संचालक तथा माजी नगराध्यक्ष भाईलाल गड्डा, जिल्हा नियोजन समिती (DPC) सदस्य सुधीर देशमुख, बालाजी बँकेचे अध्यक्ष राहुल शिंदे, जनसंघर्ष बँकेचे अध्यक्ष प्रणित मोरे, बालाजी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्याम लोखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती अनुक्रमे प्रेम राठोड, मिलिंद मानकर, केशव राठोड, अरुण हिरासिंग राठोड, नगर परिषदेचे माजी सभापती शुभाचंद्र अटल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, रामेश्वर राऊत, रामकृष्ण इंगोले, पंकज इंगोले, नगर परिषदेच्या माजी सभापती रामप्यारी नरळे, सोसायटीच्या अल्का तुंडलवार यांच्यासह शहर व तालुक्यातील राजकीय (Political) दिग्गज या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याची तारीख २० एप्रिल आहे. त्यानंतर यातील किती दिग्गज कायम राहातात, हे कळेल. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होऊन निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे.

Sanjay Deshmukh and Sanjay Rathod
Pusad APMC News : एक्याऐंशीच्या वयातही मनोहररावांचा सहकारावर दबदबा, भाजप-शिंदे गटाला वाव मिळणार?

दिग्रस बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Election) आखाड्यात तब्बल ८८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात छाननीच्या दिवशी दोन उमेदवाराचे अर्ज अवैध झाल्याने आता ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहकारी संस्थेमधून ११ उमेदवार निवडून येणार आहे. यामधुन सर्वसाधारण गटामधून २८ अर्ज महिला राखीवमधून आठ अर्ज मागासवर्गीयमधून सहा अर्ज विमुक्त जाती भटकया जमातीमधून सहा अर्ज असे एकूण ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघामधून चार उमेदवार निवडून येणार आहेत. सर्वसाधारण गटामधून १६ अर्ज अनुसूचित जाती जमातीमधून सात अर्ज, आर्थिक दुर्बल घटकांमधून सात अर्ज असे एकूण ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर अडत व व्यापारी मतदारसंघांमधून दोन उमेदवार निवडून येणार असून, पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. हमाल मापारी तोलारी मतदारसंघातून एक उमेदवार निवडून येणार असून त्यासाठी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे.

Sanjay Deshmukh and Sanjay Rathod
Yavatmal APMC Election: सहकारातील वर्चस्वासाठी आजी-माजी मंत्री भिडणार, अभद्र युतीचीही शक्यता !

छाननी अंती एकूण ८६ उमेदवार रिंगणात असून आता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यांपैकी कोणते इच्छुक आपल्या निर्णयावर ठाम राहतील, हे स्पष्ट होईल. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झाल्या नंतर खऱ्या अर्थाने २१ एप्रिलपासून निवडणुकीच्या (APMC Election) रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com