MLA Nitesh Rans Sarkarnama
विदर्भ

Nitesh Rane : नितेश राणेंनी वरूण सरदेसाईंचं नाव घेताच सभागृहात झाला गदारोळ..

मी आता वरूण सरदेसाईंचे नाव घेताच त्या सदस्यांना का झोंबले, असा सवाल नितेश राणे (MLA NItesh Rane) यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय आता ते स्वतःच फिरवत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात केला. याला उत्तर देताना आमदार नितेश राणे संतापले आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या बचावार्थ उभे ठाकले.

तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तेव्हा निर्णय घेऊ दिले गेले नाहीत आणि आता शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) असताना घेतलेले निर्णय बदलविले जात आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय, हे कितपत योग्य आहे, असा सवाल आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सभागृहात उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत एकनाथ शिंदे यांना काम केले जाऊ देत नव्हते. कुणी वरूण सरदेसाई (Varun Sardesai) नावाचा व्यक्ती बांद्र्याच्या एका ऑफिसमध्ये बसून नगररचना विभागाचे निर्णय घेत होता.

मग तेथून फाईल मंत्रालयात एकनाथ शिंदेंकडे पाठविली जात होती. त्यांना केवळ सही करावी लागत होती. कोण हा वरूण सरदेसाई, जो विधीमंडळाचा सदस्यही नव्हता, तरीही मंत्रालयातील बैठकांना तो उपस्थित रहायचा. शिंदेंना केवळ सही करण्यापुरेच मर्यादीत ठेवले गेले होते. येवढे ज्येष्ठ सदस्य असतानाही कालची पोरं त्यांना आदेश द्यायला लागली होती. त्यामुळे ते व्यतिथ झाले होते. त्याशिवाय येवढा मोठा निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळेच त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आणि उठाव केला. त्यांच्या उठावाची इतिहासात नोंद झाली. मी आता वरूण सरदेसाईंचे नाव घेताच त्या सदस्यांना का झोंबले, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाईंचे नाव घेताच विरोधी पक्षातील लोक खवळले आणि गदारोळ सुरू झाला. आरोप प्रत्यारोप होऊ लागले. त्यावर अध्यक्षांना बोलायला परवानगी दिल्यामुळेच मी बोलत आहे. कुणीही मध्ये मध्ये बोलू नय, असेही राणेंनी विरोधकांना सुनावले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना शांत केले आणि मग थोड्या वेळाने नितेश राणे यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT