सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद नवीन नाहीत. त्या अनुषंगाने केसरकर यांनी राणे यांच्यावर काल आरोप केले होते. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत या पुढे आपण राणे यांचे नाव घेणार नसल्याचा निर्वाळा दिला. दर वेळी केसरकर यांच्या टिकेला तसेच प्रत्युत्तर देणाऱ्या नितेश राणे यांनीही हिंदुत्वासाठी हे सहन करेल, असे उत्तर दिले. या दोघांमध्ये हा समजूतदारपणा आला कसा, याचा शोध अनेकांना लागत नव्हता. तो सिंधुदर्गमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागला आहे.
येत्या काळात नितेश राणे आणि दीपक केसरकर हे दोघे एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्य जनतेला व मतदारांना आश्चर्य वाटण्याची गरज नाही. आता यापुढे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची दहशत दिसणार नाही. आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बनणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळेच आमदार केसरकर यांनी नारायण राणेंविषयी पडती भूमिका घेतली, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी केली.
श्री. परुळेकर यांनी याबाबत आज प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, माझा आणि राणेंचा वाद आता जुना झाला आहे. मी जेव्हा त्यांना भेटतो, तेव्हा आदरानेच भेटतो. जिल्ह्याच्या विकासासाठी राणेंबरोबर काम करण्याची वेळ आली तर मला आनंदच होईल, असे केसरकरांनी म्हटले होते. कणकवलीचे आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पालकमंत्री बनणार असल्याचे हे संकेत आहेत, अशी चर्चा जिल्ह्यातील सामान्य जनतेत आहे. नजीकच्या काळात नीतेश राणे आणि केसरकर हे दोघे एकाच व्यासपीठावर दिसतील आणि त्याचे आश्चर्य जिल्ह्यातील सामान्य मतदार जनतेला वाटू नये. आता यापुढे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा दहशतवाद असणार नाही आणि त्याबद्दल चर्चा देखील होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.