Ashish Deshmukh Join Ncp : Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh Join Ncp : काँग्रेसमधील कोंडीमुळे आशिष देशमुख घड्याळाचा हात धरणार?

Nagpur Politics : हिंगणा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करणार...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : काँग्रेस नेते आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षातच नाराज दिसून येत आहेत. देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातलं संघर्ष काही दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दरम्यान आशिष देशमुख लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील होणार असल्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार देशमुख लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशनात सहभागी होणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Nagpaur politics)

राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशनात सहभागी होणार आहेत, या अधिवेशनात अध्यक्ष शरद पवारांसह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यातच देशमुख यांनी शरद पवारांची आवर्जून भेट घेतली होती. या भेटीनंतरच देशमुखांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चांना उधाण आले होते.

हिंगणा या ठिकाणी सभेचं आयोजन?

प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रवादीची नागपूरात बैठक होत आहे. या बैठकीत आशिष देशमुख उपस्थित राहणार आहेत. आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्या आहेत. या बैठकीनंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात, राष्ट्रवादीची मोठी सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे

काँग्रेसच्या बैठकीत देशमुखांचं काय झालं?

 माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस (Congress News) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची काँग्रेस पक्षात चांगलीच कोंडी झाली. पक्ष विपरित वक्तव्यांमुळे ते पक्षात अडचणीत आले होते. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत देशमुख यांच्याबद्दलही चर्चा करण्यात आल्याचे बोलले जाते.

(Edited - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT