Samadhan Awatade News : आमदार समाधान आवताडेंनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा; मंगळवेढ्यातील बैठकीत नेमके काय झाले?

मी कुणाच्या एक रुपयाच्या देखील मिंध्यात नाही.
Samadhan Awatade
Samadhan AwatadeSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. शेतकरी व वीज ग्राहकाची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी मी काम करत आहे. त्यात मी कुणाच्या एक रुपयाच्या देखील मिंध्यात नाही, जर असल्याचे सिद्ध केले तर त्या दिवशीच राजकारण सोडेन, असा इशारा आमदार समाधान आवताडे (Samadhan Avatade) यांनी दिला. (MLA Samadhan Awatade warned to quit politics)

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आज आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित केली हेाती. त्यात आवताडे यांनी इशारा दिला. वीजप्रश्नावर आमदार पैसे घेत असल्याची चर्चा तालुक्यातील काही शेतकरी आणि वायरमनमध्ये होत आहे, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली. ती चर्चा आवताडेंपर्यंत पोहोचल्यानंतर आमदारांनी भरबैठकीतच पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याचे राजकारण सोडण्याचा इशारा दिला.

Samadhan Awatade
Congress News : मल्लिकार्जून खर्गेंचा पराभव घडविण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नेत्यालाच काँग्रेसने दिले तिकिट!

आवताडे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर आठ दिवसांत तोडगा काढावा, त्यावर थातूरमातूर उत्तरे न देता योग्य तो साक्षमोक्ष लावावा; अन्यथा पुन्हा पंधरा दिवसांत बैठक घेवू. शेतकऱ्यांच्या तक्रारी कशा कमी करता येईल, याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांची लूट होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली.

जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर म्हणाले की, शंभर ते तीनशे मीटरच्या कनेक्शनधारकांची यादी ठेकेदाराकडे देण्याअगोदर त्या त्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी. मंजूर लाभार्थ्यांना मोबाईलवर मेसेज यावेत. आसबेवाडी येथील शेतकऱ्यांची कमी कनेक्शनधारकाला जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातात. जास्त कनेक्शनधारकाला कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जात आहेत, अशी तक्रार आहे.

Samadhan Awatade
Shinde Vs Thackeray In Thane : रोशनी शिंदेंची हालत बघितली ना? आता तुझा नंबर...: शिंदे गटाकडून युवती सेनेच्या पदाधिकारीला धमकी

प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी नवीन कनेक्शनधारकाला सहा महिने मीटर दिला जात नाही, काही वेळेस खासगी दुकानातून मीटर विकत घेण्याची सूचना दिल्या जातात. मीटरसाठी होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. नांदूर येथील परमेश्वर येणपे यांनी 33 केव्ही सबस्टेशनचे काम रखडले आहे, ते तात्काळ पूर्ण करावे. भाळवणी येथील महादेव साखरे यांनी महावितरणचे कर्मचारीच वीजतारा काढून विकत असल्याच्या तक्रार केली, तर वसंत गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे मंजूर पोलपैकी तीनच पोल उभे केले आहेत. बाकीचे पोल उभा केले नाहीत, त्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली.

भोसे येथील अशोक भगरे यांनी महावितरणच्या चुकीमुळे बेदाणा शेडचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई अद्याप दिली नसल्यामुळे मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला, अशी व्यथा मांडली. डोणज येथील अशोक केदार यांनी मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम करीत नसल्याची तक्रार केली. हुन्नूर येथील ३३ सब स्टेशनला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार शिवाजी कोरे यांनी केली.

Samadhan Awatade
Solapur University : सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरणासाठी शिंदे-फडणवीसांना बोलवणार : स्मारक समितीचा निर्णय

महावितरणच्या कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहातील वाढती गर्दी लक्षात घेता आवताडे यांना विश्रामगृहाच्या बाहेर बैठक घ्यावी लागली.

या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता शेळके, कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे, उपकार्यकारी अभियंता बी. डी. चोरमुले, भाजप संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर, सोमनाथ अवताडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com