Ashish Dedhmukh Join BJP Sarkarnama
विदर्भ

Ashish Dedhmukh Join BJP : आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी का झाली ? फडणवीसांनी सांगितले कारण...

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : नागपूर येथे काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी आज (रविवारी) जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचे कौतुक केलं. आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे, याबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण केले आहे.

काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केला होता आणि कोर्टामध्ये त्याबद्दल क्षमा मागायला देखील नकार दिला. त्यावर आशिष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात बोलल्याने तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

आज आशिष देशमुखांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. देशमुखांना पुन्हा भाजपमध्ये का घेतले याचे कारण फडणवीसांनी यावेळी सांगितले.

फडणवीस म्हणाले, " राहुल गांधींनी ज्यावेळीओबीसी समाजाचा अवमान केला आणि कोर्टामध्ये त्याबद्दल क्षमा मागायला देखील नकार दिला. त्यावर अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका ही आशिष देशमुखांनी मांडली. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मिळून ठरवले की आता देशमुखांना पुन्हा भाजपमध्ये घेतले पाहिजे,"

"सावनेरमधून निवडणूक लढवून आशिष देशमुख यांनी सुनिल केदार यांच्या तोंडचे पाणी पळवले. ते काही काळ बाहेर राहून परत पक्षात आले आहेत. पण त्यांनी घेतलेल्या निवडणूक न लढवण्याच्याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही," असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

" हा निर्णय घेण्याआधी आशिष देशमुख यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यामुळे त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला की श्रद्धा भाजपवर आणि सबुरी स्वतःच्या जीवनामध्ये," अशा शब्दात फडणवीसांनी देशमुखांच्या कामाचे कौतुक केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT