Thackeray group : ठाकरेंना तीन धक्के ; शिवसेना वर्धापनदिन पूर्वसंध्येला शिंदे गटाची खेळी ?

Maharashtra Politics : ठाकरे गटात आपल्याला डावलण्यात आले, असा आरोप तांडेल दांपत्यांने केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचा आज (रविवारी) मेळावा होत आहे. उद्या (सोमवारी) शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या पूर्वसंध्येला तीन मोठे धक्के बसले आहेत.

ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे, ठाकरे गटाच्या विधानपरिषदेचे आमदार मनीषा कायंदे, तर चुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल दापंत्यांने शिवसेनेला (ठाकरे गटाला) सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जाते आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे व शिंदे गटाचे कार्यक्रम होत आहे. या वर्धापनदिनी ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम शिंदे गटाने केले, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

चुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल पती पत्नीनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले. ठाकरे गटात आपल्याला डावलण्यात आले, असा आरोप तांडेल दांपत्यांने केला आहे. ते आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray
Ambadas Danve : अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या सत्तारांना अब्रु तरी आहे का ? दानवेंचा घणाघात

शिशिर शिंदे यांनी राजीनाम्याचे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राजीनामा देताना शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे. शिवसेनेत (ठाकरे गटात) मला मनासारखं काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. शिशिर शिंदे यांची 19 जून 2018 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.

Uddhav Thackeray
Modi Surname Case Summons Rahul Gandhi : 'मोदी आडनावा' वरुन राहुल गांधींना पुन्हा दणका ; शेवटचं समन्स..

शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे की चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केलं. माझी घुसमत मी थांबवतो, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटातील विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉटरिचेबल होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com