Ashish Jaiswal and Sudhir Mungantiwar
Ashish Jaiswal and Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Ashish Jaiswal News : सुधीर मुनगंटीवार अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक मंत्री, पण...

संजय डाफ

Sudhir Mungantiwar will take the right decision : सुधीर मुनगंटीवार मंत्री असलेल्या वनविभागाच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी काही आमदारांनी केल्या होत्या. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचाही समावेश आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, सुधीर मुनगंटीवार अतिशय प्रामाणिक मंत्री आहेत, असे ते म्हणाले. (Some MLAs had complained about corruption in the transfers of the forest department)

आज (ता. ६) साम टीव्हीशी बोलताना आमदार ज्ययस्वाल म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हुशार, संवेदनशील आणि प्रामाणिक मंत्री आहेत. त्यांनी बदल्यांचे सर्व अधिकार खाली दिले. पण खाली अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर तर केला नाही ना, गुणवत्तेनुसार नियुक्त्या होत आहेत की नाही, याची शहानिशा होणे आवश्‍यक आहे. शहानिशा केल्यानंतर मुनगंटीवार योग्य निर्णय घेतील, असा विश्‍वास आहे.

वनविभागातील बदल्यांमध्ये अनियमितता झाली असल्याची शंका घेतली गेली आहे, शंका घेण्यास वाव आहे. नियमित कामे आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तम काम करणारे अधिकारी वनविभागात आहेत. जेथे जनतेसोबत संपर्क येतो, तेथे मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना चांगले काम केलेले आहे. अशा अधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी नियुक्त्या मिळाल्या पाहिजे, असे आमदार जयस्वाल म्हणाले.

आपल्या महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात भरपूर वाघ आहेत, तरीही लोक मध्यप्रदेशातील अभयारण्यात जातात. अशा वेळी जेथे फॉरेस्ट गेट आहेत, तेथे उत्तम अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मंत्री मुनगंटीवार मागणी पूर्ण करतील, असा विश्‍वासही आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता राज्यातील तमाम जनतेला आहे. आमदारांनाही आहे आणि सरकारला देखील आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय घेताना रिजनल बॅलेंसही बघावा लागणार आहे. गुणवत्तेवर निर्णय घ्यावा लागणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमदारांची वरिष्ठताही विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

मी गेल्या २५ वर्षांपासून दर मंगळवारी मुंबईला (Mumbai) जातो, तसाच आजही चाललो आहे. मंत्रिपदासाठीच चाललो असं काही नाही. राहिला अपेक्षेचा विषय तर ती सर्वांनाच असते माझ्यापेक्षा मतदारसंघातील लोकांना जास्त अपेक्षा आहे, असे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT