विदर्भ

Ashok Chavan's Resignation : अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेस सोडणारे, ११ नव्हे तर १७ आमदार ? 'ही' आहेत संभाव्य नावे !

Maharashtra Politics : चव्हाण यांना सोडून ते पुढील राजकारण करणार नाहीत.

Atul Mehere, Abhijeet Ghormare

Ashok Chavan's resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण कॉंग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, या चर्चेने जोर धरला आहे.

१२ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे. पण ‘सरकारनामा’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नव्हे तर १७ आमदार कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. यामध्ये काही नावे प्राप्त झाली आहेत.

वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार राजू पारवे, गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सहशराम कोरेटे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर मराठवाड्यातील अमर राजूरकर यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्र सांगतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही यादी एकूण १७ आमदारांची आहे. त्यातील १२ आमदार आजच राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पैकी सुभाष धोटे यांनी राजीनामा दिल्याचीही माहिती आहे, पण त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. या यादीतील लोक अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत आणि चव्हाण यांना सोडून ते पुढील राजकारण करणार नाहीत, असेही सूत्रांनी सांगिले. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचेही नाव राजीनामा देणाऱ्यांमध्ये आहे. पण त्यांचे पती संजय खोडके यांच्याशी संपर्क केल्यानंतर आमदार खोडके काॅंग्रेसमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे आणि या मुद्द्यावरच कॉंग्रेस सोडायची की नाही, याचा निर्णय त्या घेणार असल्याचे सूत्र सांगतात. चर्चेत असलेल्या आमदारांच्या नावांपैकी काही आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ज्या कुणाशी संपर्क झाला, त्यांनी मात्र याचा साफ इन्कार केला.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT