Ashok Chavan : चव्हाणांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, "भाजपचा दुपट्टा..."

Chandrashekhar Bawankule On Ashok Chavan : "कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होत असतो. मग...", असंही बावनकुळेंनी म्हटलं.
Ashok Chavan Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, अशोक चव्हाणांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. चव्हाणांना भाजप राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Ashok Chavan Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, अशोक चव्हाणांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. चव्हाणांना भाजप राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळे म्हणाले, "काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर समन्वय घडवण्याची क्षमता नेतृत्वात नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांनी कोणत्या कारणाने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, हे पाहवं लागणार आहे. काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत."

अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं, "भाजपचा अध्यक्ष या नात्यानं अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी भाजपचा दुपट्टा, विचारधारा कुणी स्वीकारत असेल, तर स्वागत आहे."

Ashok Chavan Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan Resigned From Congress : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या!

अशोक चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच, त्या पत्रावर हातानं माजी आमदार लिहिलं आहे. निश्चित काही बोलणं झालंय का? याकडे लक्ष वेधलं असता, बावनकुळे म्हणाले, "काहीही बोलणं झालं नाही. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्यास तयार असणाऱ्यांसाठी आमचा दुपट्टा तयार आहे."

"तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील, एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. ही निवडणूक फार संघर्षाची होणार नाही. तीन भाजप, एक एकनाथ शिंदे, एक अजित पवार आणि महाविकास आघाडीची एक जागा निवडून येईल," असं बावनकुळेंनी सांगितलं.

Ashok Chavan Chandrashekhar Bawankule
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात महायुती मास्टरस्ट्रोकच्या तयारीत; महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार

अशोक चव्हाण भाजपत आले, तर फायदा होईल का? असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, "कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होत असतो. मग, बूथ, गाव किंवा देशातील प्रवेश असो. प्रत्येकाकडे क्षमता आणि वलय असते. मोदींचं वादळ भारतात येईल, तसं काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील."

Ashok Chavan Chandrashekhar Bawankule
BJP Politics : मुंबईत भाजपची बेरीज, काँग्रेसची पुन्हा वजाबाकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com