Sticker on Vehicle of EX MLA in Akola Sarkarnama
विदर्भ

MLA Ashok Stambh Sticker : आमदारकीच्या स्टिकरचा मोह भोवणार; 'त्या' माजी आमदारावर कारवाई होणार?

Who Can Use Ashok Stambh Sticker : टोलमाफी, वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लाभ

जयेश गावंडे

Akola Political News : अकोला जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या गाडीवर अशोक स्तंभ असलेला आमदारकीचा स्टिकर विषय चर्चेचा बनला आहे. आमदार, खासदार आपल्या अनेक वाहनांवर अशोक स्तंभ असलेल्या हिरव्या रंगाचा स्टिकरचा सर्रासपणे वापर करताना दिसत आहेत. यात काहीजण काही संबंध नसतानाही असे स्टिकर वाहनांवर लावून मिरवतात. त्यामुळे आजी-माजी आमदार, खासदार हे आपल्या वाहनांवर अशाप्रकारे स्टिकर लावू शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

भारतीय राष्ट्रचिन्ह असलेल्या अशोकस्तंभाचे स्टिकर गाडीवर लावणे हे एक प्रकारे व्हीआयपी संस्कृती झाली आहे. यातून टोलमाफी, वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लाभ घेतला जातो. तर समाजात वावरत असताना आमदार, खासदार म्हणून मिरवण्यासाठी वापर होताना दिसतो. यामुळे राष्ट्रीय चिन्हाचा अपमान होत असल्याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत. असे असतानाही अकोला जिल्ह्यातील एका माजी आमदाराने हिरव्या स्टिकरचा मोह अजूनही सोडला नाही. (Maharashtra Political News)

अशोक स्तंभाचा वापर कोण करू शकतो ?

  • केंद्र सरकारने २००५ साली लागू केलेल्या कायद्यात काही बदल करत २००७ साली नवी अधिसूचना जारी केली. २००७ च्या अधिसूचना मधील शेड्युल दोन नुसार राष्ट्रपती भवनमधील गाड्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह वापरण्याची परवानगी आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदासमान असलेले अतर उच्चधिकारी.

  • इतर देशातील अतिउच्चपदस्थ विदेशी अधिकारी, इतर देशातील काही प्रमुख पाहुणे, राजकुमार किंवा राजकुमारी किंवा त्यांच्या समान असलेले अधिकारी.

  • राष्ट्रपती दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीमागे चालणारी वाहने, राज्याचे राज्यपाल, संघराज्य क्षेत्राचे उपराज्यपाल.

  • परदेशात भारताच्या राजनैतिक मिशनमध्ये सहभागी प्रमुख हे त्या देशातही आपल्या वाहनांवर भारताचे राष्ट्र चिन्ह वापरु शकतात. परदेशात भारताच्या काउन्सिल पदावर असलेले अधिकारी

  • भारतातील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी, भारतात आल्यास किंवा विदेशी पाहुण्यांसह आल्यास त्यांना हे चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे.

  • या गाड्यांमधून केवळ अधिकार असलेल्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या पती अथवा पत्नीला प्रवास करण्याची परवानगी असते.

  • याशिवाय काही पदाधिकाऱ्यांना केवळ त्यांच्या राज्यातच बोधचिन्ह असलेली गाडी वापरण्याची परवानगी आहे. यात भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षराज्य विधानसभेचे सभापती आणि उप सभापती यांना आहे.

  • लेटरहेड किंवा कार्डवरही या चिन्हाचा कुणीही वापर करू शकत नाही. केवळ सरकारने प्रकाशित केलेल्या कागदपत्रांवरच या बोधचिन्हाचा वापर होतो. मात्र हल्ली आमदार, खासदारांसह अनेक माजी आमदारही सर्रासपणे वापर करताना दिसत आहेत.

चिन्हाचा कसा होतो वापर?

खासदार, आमदारांसह, माजी आमदारांच्या वाहनांवर सर्रासपणे हिरव्या रंगाचे स्टिकर दिसते. या हिरव्या रंगाच्या स्टिकरवर अशोक स्तंभाच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात येतो. हे बेकायदेशीर आहे.

..तर कारवाई होऊ शकते

भारताच्या बोधचिन्हाचा वापर करण्याची परवानगी कुणालाही नाही. व्हीआयपी कल्चर म्हणून याचा सर्रासपणे वापर केला जात आहे. यापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्या, मात्र कारवाई केली जात नाही. अधिकार नसतानाही या राष्ट्रीय चिन्हाचा वापर केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

(Edited By Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT